शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही


ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर संप येथे पाणी पुरवठा करण्यासाठी नव्याने अंथरण्यात आलेले 116‍8 मि.मी व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी नितिन कंपनी जंक्शन येथे 750मि.मी व्यासाच्या जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करणे आवश्यक असल्याने शनिवार दिनांक 1/11/2025 रोजी सकाळी 9.00 ते रविवार दिनांक 02/11/2025 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.


सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेतंर्गत इंदिरानगर जलकुंभ, श्रीनगर जलकुंभ, वारलीपाडा जलकुंभ, कैलासनगर रेनो टँक, रुपादेवी जलकुंभ, रुपादेवी रेनो टँक, रामनगर जलकुंभ, येऊर एअर फोर्स जलकुंभ, लोकमान्य जलकुंभ अंतर्गत येत असलेल्या भागांचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.


पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून पाणी कपातीच्या काळात नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


Comments
Add Comment

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना

Bacchu Kadu Farmers Andolan : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू आज मुंबईत; संध्याकाळी ७ वाजता थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा!

७ वाजता महाबैठक! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार मुंबई : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून