बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा बाजारावर आहे. इथं सट्ट्याचे भाव अक्षरशः चढ-उतार घेत आहेत, पण सध्या एनडीएच्या बाजूने हवा दिसतेय.


सट्टा बाजारात एनडीए आघाडीवर


फिलोदी सट्टा बाजारात एनडीएच्या सरकारची शक्यता सर्वाधिक दाखवली जात आहे. सट्टेबाज सांगतात, जर एनडीएवर ₹1000 ची बाजी लावली, तर त्याचा परतावा ₹2000 पर्यंत मिळू शकतो.


जागांचा अंदाज:


एनडीए: 128 ते 132 जागा ( तर 135-138 पर्यंतही अंदाज)


महागठबंधन: 97 ते 100 जागा.


सध्याच्या चित्रात एनडीएला स्पष्ट आघाडी मिळाल्याचं दिसतं, तर महागठबंधनचा ग्राफ हळूहळू खाली जातोय.


मुख्यमंत्री या पदासाठी नितीश कुमारच आघाडीवर:


सट्टा बाजारात नीतीश कुमार यांच्या नावाचे भाव 40-45 पैशांवर स्थिर आहेत. मुख्यमंत्री या पदासाठी नितीश कुमार आघाडीवर आहेत.


महागठबंधनची स्थिती चिंताजनक


महागठबंधन १०० पेक्षा कमी जागांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज सट्टेबाजांनी व्यक्त केला आहे.


मतदानाच्या तारखा आणि पुढील अंदाज: 


बिहारमध्ये दोन टप्प्यांत मतदान 6 आणि 11 नोव्हेंबरला होणार आहे. सट्टेबाजांच्या मते, प्रचाराची गती वाढेल तसतसे बाजारातील आकडे, मतदारसंघांचे भावही बदलू शकतात.


एकूणच, फिलोदी सट्टा बाजारात सध्या एनडीएला हिरवा सिग्नल आणि महागठबंधनला लाल दिवा दिसून येतोय!

Comments
Add Comment

एक लाख 'ड्रोन वॉरियर्स'सह 'भैरव स्पेशल फोर्स' सज्ज

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; भारतीय लष्कराची झेप नवी दिल्ली : आधुनिक युद्धशास्त्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवत

कुटुंबातील घट्ट नाती ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना रोखू शकतात: मोहन भागवत

भोपाळ : एका कुटुंबात पालक आणि मुलांमधील संवाद आणि त्यांच्यातील घट्ट नाते लव्ह जिहादसारख्या घटना रोखू शकतात.

‘एक्स’वर महिलांचे आक्षेपार्ह फोटो, 'एआय'च्या गैरवापराबद्दल खासदारांचं मोदी सरकारला पत्र!

नवी दिल्ली : शिवसेना (उबाठा)च्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकतेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि

तिरुपती गोविंदराजस्वामी मंदिरात मद्यपीचा धिंगाणा

तिरुपती : मद्याच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने तिरुपतीमधील श्री गोविंदराजस्वामी मंदिरात धिंगाणा घातल्याचा

'भाजपकडे पाहून संघाचे आकलन करणे चूक'

भोपाळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गणवेशाचा वापर करण्यात येत असला आणि शारीरिक कसरतींना

विद्यार्थ्यांना दंडाऐवजी समाजसेवा करण्याचा न्यायालयाचा आदेश; जेईई मेन्स उत्तरपत्रिका फेरफार प्रकरण

नवी दिल्ली : संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई मेन्स) २०२५ च्या उत्तरपत्रिकेत फेरफार केल्याचा आरोप असलेल्या दोन