राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. यात लाडघर, गुहागर, श्रीवर्धन, नागाव आणि पर्णका या समुद्रकिनाऱ्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षा ऑडिटची प्रक्रिया सुरू आहे. यापैकी लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांचे ऑडिट पूर्ण झाले असून उर्वरीत दोन समु्द्रकिनाऱ्यांचे ऑडीट लवकरच पूर्ण होणार आहे.


'ब्ल्यू फ्लॅग'च्या अंतिम नामांकनासाठी या पाचही समुद्रकिनाऱ्यांचे सुरक्षा ऑडिट होणे गरजेचे आहे. त्यानुसार काही दिवसांपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. यातील तीन समुद्रकिनाऱ्यांचे ऑडीट झाले आहे. उर्वरीत दोन समुद्रकिनाऱ्यांपैकी नागाव समुद्रकिनाऱ्याचे ऑडीट कालपासून (२७ ऑक्टोबर) सुरू करण्यात आले आहे. तर ३० ऑक्टोबरपासून पर्णका (डहाणू ) या समुद्रकिनाऱ्याचे सुरक्षा ऑडिट सुरू केले जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.




सुरक्षा ऑडिटमध्ये या समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येते. यात प्रामुख्याने सेफ स्विमिंग झोन निश्चित करून त्यांचे मार्किंग करण्याचे काम केले जाते. याशिवाय या समुद्रकिनाऱ्यांवर पुरेशा जीवरक्षकांची नेमणूक करणे, समुद्रकिनाऱ्याजवळ पोहोचण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा आहेत का? या बाबी तपासण्यात येतात.


'ब्लू फ्लॅग' म्हणजे काय?
जे समुद्रकिनारे पर्यावरणाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि सौंदर्याने नटलेले असतात. तसेच, पर्यटनासाठी विशेष असतात अशा समुद्रकिनाऱ्यांची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर केली जाते. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त ब्लू फ्लॅग हे मानक दिले जाते.

Comments
Add Comment

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,

नेरळ–माथेरान मिनी ट्रेन’ पुन्हा रुळावर!

पर्यटकांसाठी ऐतिहासिक रेल्वे सेवा १ नोव्हेंबरपासून रायगड : महाराष्ट्रातील प्रसिद्ध

फलटण महिला डॉक्टर प्रकरण, हॉटेल रूममधल्या 'त्या' शेवटच्या क्षणांचं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; डॉक्टरच्या आत्महत्येमागे नेमकं काय घडलं?

फलटण : महाराष्ट्रातील फलटण शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्यात