बचत गटाच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणार : पालकमंत्री नितेश राणे

महिला सक्षमीकरणासाठी शासनाचे अनेक धाडसी निर्णय


वैभववाडी  : महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र शासनाने धाडसी निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्व योजना महिलांना आत्मनिर्भयतेकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. शासनाच्या असंख्य योजनांमुळे प्रत्येकाच्या घरात आर्थिक समृद्धी आली आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न गतीने वाढविण्यासाठी महिला सक्षम बनली पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.


वैभववाडी येथे आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानांतर्गत मातृशक्ती महिला मेळावा पार पडला. या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी ना. नितेश राणे म्हणाले, मोदींनी मागील दहा वर्षात घेतलेले निर्णय महिलांना आत्मनिर्भयतेकडे घेऊन जाणारे आहेत, परदेशी वस्तूवर अवलंबून न राहता देशाला स्वतःच्या ताकदीवर महासत्ता बनविण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी यांचे आहे. यासाठीच केंद्र व राज्य शासनाच्या असंख्य योजना तळागाळापर्यंत राबविण्यात येत आहेत. लखपती दीदी, मुख्यमंत्री लाडकी बहीण यासारख्या असंख्य योजनांचा पुरेपूर फायदा समाजातील महिलांना होत आहे. या योजनांमुळे प्रत्येकाच्या घरात आर्थिक समृद्धी आली आहे. या योजना बंद होणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.


जिल्ह्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून ५५ कोटींची उलाढाल होत आहे. दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी महिलांनी सक्षम बनले पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभा करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. पहिल्या पाच मध्ये आपला मॉल असेल असे नितेश राणे यांनी सांगितले.


जिल्ह्यातील बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपली उत्पादने पोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लवकरच मंत्रालयात बचत गटांसाठी खाद्य महोत्सव घेणार असे सांगितले. यावेळी नितेश राणे म्हणाले, महिलांना सक्षम बनवणारे नेतृत्व सत्तेत राहिले पाहिजे. याची काळजी महिला भगिनींनी घेतली पाहिजे. नेतृत्व राहिलं नाही तर योजना बंद पडेल असे त्यांनी सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पदावर राहिले पाहिजेत असे नितेश राणे यांनी सांगितले. उमेद हे माध्यम आहे. उमेदच्या पाठीशी लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम उभा आहे, असे नितेश राणे यांनी सांगितले. शितल पुंड म्हणाल्या, एक लाख उद्योजिका निर्माण झाल्या पाहिजेत. उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे. महिलांनी स्वतः मेहनत घेतली पाहिजे.


नवीन गट तयार करा, दुसऱ्यांना मदत करा, चांगल्या उद्योजिका बना असे सांगितले. संध्या तेरसे म्हणाल्या, माता भगिनी सक्षम व्हाव्यात यासाठी आत्मनिर्भर अभियान सुरू आहे. शेवटच्या घटकातील माणूस आर्थिक आत्मनिर्भर व्हावा यासाठी नरेंद्र मोदीजी प्रयत्न करत आहेत. छोटे-मोठे उद्योग निर्माण करा, महिला सक्षम तर कुटुंब सक्षम, प्रत्येक व्यवसाय जबाबदारीने व कष्टाने उभा करा असे आवाहन त्यांनी केले. वैभववाडी भाजपच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.

Comments
Add Comment

कोकणासाठी सोनेरी दिवस; महाराष्ट्र सरकार उभारणार वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग

मंत्री नितेश राणेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण

Game Changer Decision.... वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाला हिरवा कंदील, कोकणच्या विकासाची दारं उघडणार!'

आंबा, काजू, मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार; तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध होईल – मंत्री नितेश राणे नागपूर:

नाताळनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर तीन विशेष गाड्या

कणकवली : हिवाळा आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने

‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’कडे हस्तांतरित करू नये

उच्चाधिकार समितीचा निकाल सावंतवाडी : महाराष्ट्र आणि गोवा सीमेवर ‘ये-जा’ करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’कडे

कणकवलीत उद्या नगरपंचायतीसाठी मतदान

ईव्हीएमसह अधिकारी - कर्मचारी केंद्रांकडे रवाना कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या (२ डिसेंबर) मतदान

कणकवली बाजारपेठेत भाजपची प्रचार रॅली

कणकवली : भारतीय जनता पार्टीच्या कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे आणि १७ नगरसेवक