कधी प्रदर्शित होणार द फॅमिली मॅन सीझन ३


मुंबई : मागील चार वर्षांपासून अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवरील द फॅमिली मॅन या मालिकेचे (वेब सीरिज) चाहते नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांनी अपडेटसाठी सातत्याने विनंती केली, मेल केले, आणि जवळजवळ प्रत्येक सोशल मीडियावरील पोस्टवर कमेंट करून तिसऱ्या सीझनबद्दल माहिती मागितली आहे.


चाहत्यांची ही मागणी आता फक्त भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही जगभरात द फॅमिली मॅन ३ बद्दल उत्सुकता आहे. हा उत्साह आता एकप्रकारे उन्माद झाला आहे, जो केवळ प्राइम व्हिडीओवरच नाही तर राज-डीके, मनोज बाजपेयी, शारीब हाशमी आणि इतर कलाकारांच्या सोशल मीडियावरही दिसून येत आहे.


चाहत्यांच्या मागणीची दखल घेत अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने उद्या म्हणजेच मंगळवार २८ ऑक्टोबर २०२५ रोजी द फॅमिली मॅन सीझन ३ बाबत महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे जाहीर केले आहे.


राज आणि डीके यांच्या जोडीने त्यांच्या D2R Films या बॅनरखाली बनवलेली द फॅमिली मॅन ही लोकप्रिय मालिका (वेब सीरिज) हेरगिरी आणि ॲक्शनने भरलेली कथा आहे. यात मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत श्रीकांत तिवारी म्हणून दिसतात. त्यांच्या सोबत जयदीप अहलावत, निमरत कौर, शारिब हाशमी, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, वेदांत सिन्हा, श्रेया धन्वंतरी आणि गुल पनाग यांसारखे कलाकारही झळकणार आहेत.


या मालिकेची कथा राज, डीके आणि सुमन कुमार यांनी लिहिली आहे, संवाद सुमित अरोरा यांनी दिले आहेत. दिग्दर्शन राज-डीके यांनी केले आहे. या सीझनमध्ये त्यांच्यासोबत सुमन कुमार आणि तुषार सेठही दिग्दर्शक म्हणून सहभागी झाले आहेत.


द फॅमिली मॅन सीझन ३ लवकरच फक्त प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. ही मालिका भारतासह जगभरातील २४० पेक्षा अधिक देश आणि प्रदेशांमध्ये पाहता येणार आहे.


Comments
Add Comment

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'

मुंबई : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे.

"देऊळ बंद २" येतोय २१ मे रोजी

मुंबई : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या "देऊळ बंद" चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि

मातृभूमी’मधील ‘चांद देख लेना’ गाण्याचा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित

मुंबई : सलमान खान फिल्म्स संगीतने सर्वांच्या आवडीच्या ‘चांद देख लेना’ या गाण्याचा एक विशेष पडद्यामागील व्हिडीओ

'मराठी माणसाच्या असंख्य आठवणींचे गाठोडे म्हणजे भारतमाता'

मुंबई : लालबाग, परळ आणि गिरणगावातील असंख्य मराठी माणसाच्या आठवणींचे एक मोठे गाठोडे घेऊन भारतमाता सिनेमागृह उभे

Bigg Boss Marathi 6 : शेवटची कॅप्टनसी कोणाला मिळणार ? प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चेर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले असून बिग