वाढवण बंदरामध्ये हजारो स्थानिक तरुणांना मिळणार रोजगार

तरुणांसाठी 'जीपी रेटिंग प्री-सी ट्रेनिंग कोर्स' सुरू


एससीआय मेरीटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसोबत सामंजस्य करार


पालघर  : भारतातील १३ वे प्रमुख बंदर असलेल्या वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड मध्ये स्थानिक तरुणांना नोकरीची संधी मिळावी यासाठी व्हीपीपीएल वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. तरुणांना समुद्री क्षेत्रातील आवश्यक कौशल्य आणि ज्ञान अवगत व्हावे यासाठी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एससीआय) मेरीटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (एमटीआय) सोबत ‘जीपी रेटिंग प्री-सी ट्रेनिंग कोर्स’ संयुक्तपणे आयोजित करण्यासाठी एक सामंजस्य करार(एमओयू) नुकतेच करण्यात आला. जेएनपीएचे अध्यक्ष आणि व्हीपीपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, उन्मेष शरद वाघ, (भा.रा.से.), आणि एससीआयचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन बिनेश कुमार त्यागी यांनी या करारावर स्वाक्षरी केली.


करारात नमूद करण्यात आले की, व्हीपीपीएल द्वारे प्रायोजित उमेदवारांसाठी एससीआय -एमटीआय हा कोर्स आयोजित करेल, ज्यामध्ये समुद्री क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्रदान करून त्यांना समुद्री क्षेत्रातील करिअरसाठी तयार केले जाईल. एससीआय मॅरीटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना शॉर आणि फ्लीट कर्मचारी यांच्या प्रशिक्षण व पुनःप्रशिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात आली आहे. कंपनी आणि भारत सरकारच्या दृष्टिकोनानुसार ही सेवा बाह्य सहभागींनाही प्रदान केली जाते, जेणेकरून भारत एक प्रगत समुद्री देश बनू शकेल. दरम्यान, एससीआय-एमटीआयला जीपी रेटिंग प्री-सी ट्रेनिंग कोर्स आयोजित करण्यासाठी शिपिंग महासंचालनालयाची मान्यता आहे. प्रशिक्षण कोर्सचा कालावधी सहा महिने आहे. प्रशिक्षण कोर्स निवासी स्वरूपाचा असेल. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आणि सीफेरर्स ट्रस्ट (बेस्ट) साठी परीक्षा मंडळाने घेतलेल्या एक्झिट परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर, बेस्टकडून प्रमाणपत्र जारी केले जाईल. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, व्हीपीपीएलने कौशल्य विकास कार्यक्रमाची नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि आगामी अभ्यासक्रम आणि संधींबद्दल माहिती प्रदान करण्यासाठी एक समर्पित चॅटबॉट सुरू केला आहे. आतापर्यंत, या कार्यक्रमाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे, वाढवण परिसरातील गावांमधील तरुणांकडून आतापर्यंत ३८ हजाराहून अधिक नोंदणी झाल्या आहेत.

वाढवण बंदराच्या परिसरातील गावांमध्ये राहणाऱ्या स्थानिक तरुणांना कौशल्य-आधारित उपजीविकेचे प्रशिक्षण देण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. या करारामुळे स्थानिक तरुणांना शिपिंग क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. एससीआय मेरीटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसोबतच्या या सहकार्याद्वारे, आम्ही स्थानिक तरुणांना भारताच्या सागरी परिसंस्थेच्या वाढीस हातभार लावण्यासाठी आणि त्यांची फायदेशीर सागरी कारकीर्द घडवण्याचा दृष्टीने आम्ही कटिबद्ध आहोत. - उन्मेष वाघ. ( भा.रा.से.) अध्यक्ष जेएनपीए तथा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्हीपीपीएल.

Comments
Add Comment

मच्छीमारांना आता क्यूआर कोडचे ओळखपत्र

हानिकारक मासेमारीवर बंदी नवीन नियमानुसार, एलईडीद्वारे मासे पकडणे, पेयर ट्रॉलिंग आणि बुल ट्रॉलिंगसारख्या

पालघर नगर परिषदेत तिरंगी लढतीची चिन्हे!

मोबिन शेख पालघर : आगामी पालघर नगर परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये चुरस वाढली असून तिरंगी लढतीचे संकेत

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

खासदार डॉ. सवरा पालघरचे निवडणूक प्रभारी

आमदार राजन नाईक वसई-विरारचे निवडणूक प्रमुख पालघर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जास शासन हमी

मुंबई : विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील