कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. या तपासणी दरम्यान दोन मद्यधुंद दुचाकीस्वारांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यात बसला लागलेल्या भीषण आगीमुळे २० जणांचा मृत्यू झाला होता.



या अपघातात एक दुचाकी बसखाली आल्याने तिची इंधन टाकी फुटली आणि बसने पेट घेतला अशी प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र, कुर्नूल रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) कोया प्रवीण पीटीआयसोबत बोलतना म्हणाले, "आम्हाला नुकताच फॉरेन्सिक रिपोर्ट मिळाला. ज्यात दुचाकीवरील दोन्ही व्यक्ती (शिव शंकर आणि एरी स्वामी) नशेत असल्याचे स्पष्ट झाले आहे." महत्वाचे म्हणजे, पोलिसांना हे माहीत होते. पण, पोलीस या वस्तुस्थितीचा फॉरेन्सिक रिपोर्ट येण्याची वाट पाहत होते, असेही ते म्हणाले.






पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यारात्री २ वाजता शंकर आणि एरी स्वामी हे लक्ष्मीपुरम गावातून तुग्गली गावाकडे जात होते. प्रवासादरम्यान दोघांनी एका ढाब्यावर जेवण केले होते. जेथे स्वामीने दारू प्यायल्याचे कबूल केले आहे. कुर्नूलचे पोलीस अधीक्षक विक्रांत पाटील यांनी सांगितले की, पेट्रोल भरल्यानंतर शंकर बेपर्वाईने दुचाकी चालवत होता. थोड्याच वेळात त्यांची दुचाकी घसरली आणि शंकर उजव्या बाजूला पडून डिव्हाईडरला धडकला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.



शंकरचा मृत्यू झाल्याचे पाहिल्यानंतर स्वामी दुचाकी रस्त्यावरून बाजूला करण्याच्या विचारात असतानाच, मागून येणारी भरधाव बस दुचाकीवरून गेली. तिच्यासोबत ती दुचाकीही काही अंतरापर्यंत घसरत गेली. यामुळेच बसने पेट घेतला. बसला आग लागल्यानंतर भयभीत झालेला स्वामी तेथून पळून गेला. या नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.

Comments
Add Comment

जवाद सिद्दिकीला १३ दिवसांची ईडी कोठडी

नवी दिल्ली :  दिल्लीतील एका न्यायालयाने बुधवारी अल फलाह विद्यापीठाचे प्रमुख व संस्थापक जवाद अहमद सिद्दिकी यांना

नितीश कुमार यांचा आज शपथविधी

दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपचेच नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल संयुक्त (जेडीयू) आणि भाजपने

निवडणुकीवर संकट?

आरक्षण मर्यादा प्रकरणी २५ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी नवी दिल्ली : राज्यात सध्या सुरू

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini