उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेवा-सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले.


‘फिट मुंबई’ पुढाकारांतर्गत ‘फिट सॅटर्डे’ मोहिमेचा शुभारंभ शनिवस्ती २५ ऑक्टोबर २०२५ रोजी वांद्रे किल्ला उद्यान येथे करण्यात आला, त्यावेळी गगराणी हे बोलत होते. व्यायाम न करणाऱ्यांना ‘फिट सॅटर्डे’ मोहिमेमुळे नियमित व्यायाम करण्याची प्रेरणा मिळावी, हा या मोहिमेचा उद्देश आहे. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. कृष्णप्रकाश, उपआयुक्त (परिमंडळ ३) विश्वास मोटे, सहायक आयुक्त (एच पश्चिम) दिनेश पल्लेवाड, सहायक आयुक्त (के पूर्व) नितीन शुक्ला तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.


महानगरपालिका आयुक्त गगराणी पुढे म्हणाले की, “स्वतःच्या आरोग्यासाठी नियोजन, विचार आणि इच्छा असणे ही समृद्ध आरोग्याची किल्ली आहे. त्यामुळे कोणतीही कारणे न देता स्वतःच्या आरोग्यासाठी श्रम घेण्याची तयारी असली पाहिजे. देशातील सर्वात व्यस्त आणि प्रधानमंत्री पदावर कार्यरत असणारे नरेंद्र मोदी दररोज स्वतःसाठी ४५ मिनिटे योगसाधनेला देतात. त्यामुळे कोणतीही सबब न देता आपण दैनंदिन जीवनात स्वतःच्या आरोग्यासाठी नियमित वेळ द्यायलाच हवा. नियमित व्यायाम केल्यास मानसिक, भावनिक आणि शारीरिक तंदुरुस्ती राखली जाते. म्हणूनच आपले जीवन आनंदाने आणि ऊर्जेने जगण्यासाठी व्यायाम अत्यावश्यक आहे. या मोहिमेचे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होतानाच मुंबईकरांनी मोहिमेला बळ द्यावे,” असे आवाहन गगराणी यांनी केले.


महानगरपालिका आरोग्यसेवा क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करते. नागरिकांनी स्वतःच्या आरोग्यासाठी नियमित वेळ दिल्यास महानगरपालिकेच्या आरोग्य अर्थसंकल्पात मोठी बचत होऊ शकते. आजार-प्रतिबंधासाठी उत्तम आरोग्य आणि नियमित व्यायाम यासाठी प्रत्येक वयोगटातून पुढाकार आवश्यक असल्याचेही श्री. गगराणी यांनी नमूद केले.


परिमंडळ ३ चे उपआयुक्त विश्वास मोटे म्हणाले की, ‘फिट सॅटर्डे’ मोहिमेचा उद्देश – न चालणाऱ्यांना चालायला लावणे, चालणाऱ्यांना जॉगिंगसाठी प्रोत्साहित करणे आणि जॉगिंग करणाऱ्यांना धावण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. नियमित व्यायामाने आजारांचे प्रतिबंध होऊ शकतात. प्रत्येक शनिवारी वांद्रे किल्ला उद्यान परिसरात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन या मोहिमेला पाठबळ द्यावे,” असे आवाहन मोटे यांनी केले.



‘एल अँड टी-बीएमसी कोस्टल रोड हाफ मॅरेथॉन’चे आयोजन


“फिट मुंबई” या अभियानाचे घोषवाक्य ‘फिटनेस दिल से’ असे आहे. प्रत्येक मुंबईकराच्या फिटनेस प्रवासाला नवी दिशा देत, बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अंतर्गत जागतिक दर्जाचा सायकलिंग ट्रॅक, नयनरम्य विहार क्षेत्र (प्रोमेनेड) अशा उत्कृष्ट सोयी-सुविधा निर्माण केल्या आहेत.

Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी

मागील ११ वर्षांत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ११० हून अधिक मराठी शाळांना टाळे मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईकरांच्या आरोग्याला महापालिका निवडणुकांचा फटका !

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी दरम्यान, शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई