मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरची हत्या, पत्नीला अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या संघटनेचा पदाधिकारी नकुल आनंद भोईर (वय ४०) याचा त्याच्या पत्नीनेच कापडाने गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही घटना भोईर कॉलनीतील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास घडली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चैताली नकुल भोईर (वय २८) हिला तात्काळ अटक करण्यात आली असून तिला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, नकुल भोईर पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद वाढत चालले होते. गुरुवारी रात्री दोघे आरोग्य केंद्राच्या इमारतीत बोलत असताना पुन्हा भांडण झाले आणि संतापाच्या भरात चैतालीने नकुलचा गळा दाबून खून केला. घटनेनंतर तिने स्वतःच पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला.


चैतालीला अटक झाली त्या वेळी तिची दोन आणि पाच वर्षांची मुलं घरी झोपलेली होती. घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. नकुल भोईरचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.


नकुल भोईर राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) कार्यकर्ता होता आणि चिंचवड परिसरात त्याचा मोठा जनसंपर्क होता. तो आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढवण्याच्या तयारीत होता. त्याची पत्नी चैताली हीदेखील समाजसेवेमध्ये सक्रिय होती आणि भविष्यात नगरसेविका होण्याची तिची इच्छा होती. दोघे मिळून साडी सेंटर चालवत होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Jyotiba Shravan Shashti Yatra 2026 : श्री ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रेला २ लाख भाविकांची उपस्थिती

कोल्हापूर : वाडी रत्नागिरी म्हणजे जोतिबा डोंगर येथील श्री ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रेला यंदा भाविकांचा

Maharashtra Anti-Conversion Act : 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य' कायद्याची रक्षाबंधनापासून अंमलबजावणी

- महायुती सरकारची लाडक्या बहिणींना विशेष भेट; १० वर्षांपर्यंत कारावास, ७ लाखांचा दंड, धर्मांतराच्या उद्देशाने

Beed Crime : सीझर झालं, गोंडस बाळाचा जन्मही झाला पण... आईच्या पोटात अशी काही वस्तू राहिली की सगळ्यांनाच धक्का बसला

Beed : बीड जिल्हा रुग्णालयात घडलेला एक प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय

Eknath Shinde : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मधील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला ५० कोटी देण्याचा निर्णय

प्रत्यक्ष स्मारकाच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई : बुलडाणा

Anand Bansode : आनंद बनसोडे यांची ऑस्ट्रेलियाच्या माऊंट कोसिअस्कोवर तिसऱ्यांदा यशस्वी चढाई

पुणे : ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर माऊंट कोसिअस्कोवर ३६० एक्स्पलोररचे संस्थापक एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे

Prakash Abitkar : सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित, उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

सर्पदंशाची प्रत्येक घटना, विषप्रतिबंधक लसीचा साठा, केलेले उपचार व मृत्यूची माहिती होणार नोंदबद्ध मुंबई :