पाच महिन्यांचा छळ आणि अखेर दुर्दैवी शेवट; डॉक्टर तरुणी प्रकरणाची A टू Z कहाणी उघड

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिस आणि राजकीय दबावाला कंटाळून आत्महत्या केल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. मुळची बीड जिल्ह्याची असलेली ही तरुण डॉक्टर 23 ऑक्टोबरच्या रात्री फलटणमधील एका नामांकित हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतावस्थेत सापडली. गेल्या पाच महिन्यांपासून तिचा पोलिस अधिकाऱ्यांकडून आणि काही प्रभावशाली व्यक्तींंकडून मानसिक व लैंगिक छळ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.



आता पर्यंत काय काय घडलं:


१९ जून २०२५ रोजी डॉक्टर तरुणीने फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी (DySP) यांच्याकडे PSI गोपाळ बदने व इतरांविरोधात लैंगिक छळ आणि अत्याचाराबाबत लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर जून ते ऑक्टोबर दरम्यान तिच्यावर वैद्यकीय तपासात अडथळा आणला असा आरोप करून विभागीय चौकशी लावण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रांमध्ये तिने सततच्या छळामुळे मानसिक ताण व आत्महत्येच्या विचारांबाबत इशारा दिला होता.


२३ ऑक्टोबरच्या रात्री, भाऊबीज दिवशी, ती आपल्या हॉटेल रूममध्ये मृतावस्थेत आढळली. तिच्या हाताच्या तळव्यावर लिहिलेल्या चिठ्ठीत PSI गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे होती. कुटुंबीय व सहकाऱ्यांचा आरोप आहे की शवविच्छेदन प्रकरणांमध्ये दस्तऐवज बदलण्याचा दबाव तिच्यावर आणला जात होता.


२४ ऑक्टोबर रोजी सातारा पोलिसांनी दोघांविरोधात बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने PSI बदने यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिले. प्रशांत बंकरला अटक झाली असून गोपाळ बादणे फरार आहे. त्याच्या शोधासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत.



ते खासदार कोण?


डॉ. तरुणीने केलेल्या गंभीर आरोपानुसार, एका खासदार आणि त्यांच्या दोन पीएंनी फोनवरून संवाद साधला असल्याचे समोर आले आहे. संबंधित नेत्याचे नाव स्पष्ट न केल्याने तो विद्यमान की माजी खासदार असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजप नेते आणि माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव घेतले आहे. तसेच खासदारांचे पीए राजेंद्र शिंदे आणि नागटिळक यांचा या प्रकरणात थेट संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, प्रशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

सातारा : साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. या

फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, निलंबित PSI बदनेचा शोध सुरू

सातारा : सातारा जिल्हातील फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांना २४ तासांच्या आत आरोपी प्रशांत

तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद, भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर समितीने घेतला निर्णय

तुळजापूर : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरची आई तुळजाभवानी ही अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी आहे. याच कारणामुळे या

मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरची हत्या, पत्नीला अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि