पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असलेला बाबाराव भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. काही महिन्यांपासून सुरू असलेले पुलावरील काम थांबल्याने दिवाळीच्या काळात नागरिकांना दिलासा देत हा पूल काही दिवसांसाठी खुला करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) सकाळपासून हा पूल बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडीचे संकट कायम राहणार आहे.


महामेट्रोच्या डेक्कन स्थानकाला नारायण पेठ परिसराशी जोडणारा पादचारी पूल बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात अवजड लोखंडी संरचना बसवण्यात येत असल्याने, सुरक्षेच्या कारणास्तव भिडे पूल पूर्णतः बंद ठेवला आहे. दिवाळीच्या काळात लक्ष्मी रस्ता आणि मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन हा पूल ११ ऑक्टोबरपासून सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत तात्पुरता खुला करण्यात आला होता. परंतु आता पुन्हा काम गतीने सुरू झाल्याने तो डिसेंबरअखेरपर्यंत बंद राहणार आहे. नव्या वर्षातच भिडे पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला होईल. तोपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन महामेट्रोच्यावतीने करण्यात आले आहे.


पर्यायी मार्ग : भिडे पूल बंद असताना वाहनचालकांनी संभाजी पूल, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल आणि काकासाहेब गाडगीळ पूल या पुलांचा वापर करावा. प्रशासनाने या मार्गांवरील वाहतूक सुरळीत राहावी म्हणून विशेष व्यवस्था केली आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन