मुंबई : मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांदरम्यानचा प्रवास आता अधिक जलद आणि सुरळीत होणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. एमएसआरडीसीने आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दहा पदरी (Ten-Lane) करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातला सविस्तर प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लवकरच राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवणार आहे. हा दहा पदरी एक्स्प्रेस वे पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे प्रवासातील वेळेची मोठी बचत होणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
'१० दिवसांत' सरकारकडे प्रस्ताव
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील (Mumbai-Pune Expressway) वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) वेगाने काम करत आहे. एक्स्प्रेस वे दहा पदरी (Ten-Lane) करण्याचा प्रस्ताव येत्या १० दिवसांमध्ये राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. सध्या या महामार्गावरून दररोज ६५ हजारांपेक्षा जास्त वाहने धावतात. हा महामार्ग या वाहनांच्या संख्येसाठी अपूरा पडू लागल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या सर्व समस्या विचारात घेऊन एमएसआरडीसीने हा महामार्ग १० पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव मंजूर होताच, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सुसाट आणि जलद प्रवासासाठी उपलब्ध होईल, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या (Suicide) प्रकरणाने आता अत्यंत धक्कादायक वळण घेतले आहे. ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचे दहा पदरीकरण; १५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित
सध्या सहा पदरी असलेला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आता दहा पदरी करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) यासाठी हालचालींना वेग आला असून, तयारी सुरू करण्यात आली आहे. एक्स्प्रेस वेच्या या मोठ्या विस्तारीकरणासाठी सुमारे ₹१५,००० कोटींचा (पंधरा हजार कोटी) प्रचंड खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग २०३० पर्यंत दहा पदरी केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा महामार्ग ९४.६ किलोमीटर लांबीचा असून, यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे, सततची वाहतूक कोंडी, अपघात, वाहनचालकांच्या समस्या, या सर्व बाबी लक्षात घेऊन भविष्यातील गरजांचा विचार करून एक्स्प्रेस वेचा विस्तार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पूर्वी सहा पदरीवरून आठ पदरी करण्याची योजना होती, पण आता थेट दहा पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी आणखी कमी करण्यासाठी १३ किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे (Missing Link Project) कामही वेगाने सुरू आहे. हे काम काही दिवसांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ आणखी कमी होईल.