दुचाकीच्या धडकेत बसला भीषण आग! २० जणांचा मृत्यू, चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केले दु:ख

आंध्र प्रदेशः हैदराबाद-बंगळूर महामार्गावर कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुर गावाजवळ आज पहाटे आगीबाबत एक मोठी दुर्घटना घडली. 'कावेरी ट्रॅव्हल्स'च्या खासगी स्लीपर कोच बसला एका दुचाकीने धडक दिल्यानंतर बसने भीषण पेट घेतला. या दुर्घटनेत २० प्रवाशांचा जागीच दुर्दैवी अंत झाला असून, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. त्यात स्लीपर कोच बस असल्यामुळे बसमधील अनेक प्रवासी गाढ झोपेत होते. यावेळी दुचाकीची धडक बसच्या इंधन टाकीला लागली. त्यामुळे बसच्या इंधन टाकीपासून आग लागण्यास सुरुवात झाली. ही आग एवढी वेगात पसरली की प्रवाशांना बाहेर पडायला फारसा वेळ मिळाला नाही. त्यात ज्या प्रवाशांना आगीचा अंदाज आला त्यांनी आपत्कालीन दरवाजा उघडून बसबाहेर उड्या मारल्या आणि आपला जीव वाचवला. या अपघातात जखमी झालेल्या सर्व प्रवाशांवर कर्नूल येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.





या दुर्घटनेबाबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या समाजमाध्यमाच्या अधिकृत खात्यावर पोस्ट करत सांगितले की, "चिन्ना टेकुरजवळ झालेल्या बस अपघाताची बातमी ऐकून मोठा धक्का बसला. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींवर योग्य उपचार व्हावेत आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत मिळावी, यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत."

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली, मात्र तोपर्यंत २० जणांनी जीव गमावला होता. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Comments
Add Comment

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा