या आगीत रेखा शिसोडिया (आई) आणि पायल शिसोडिया (मुलगी) हे दोघे दुर्दैवाने मृत्युमुखी पडले. प्राथमिक माहितीनुसार, स्वयंपाकघरातील इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. घरात तीन गॅस सिलिंडर असल्याने आगीचा भडका उडाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेची माहिती मिळताच कळंबोली, पनवेल आणि न्यू पनवेल अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणण्यात यश आले. दलाच्या तत्परतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, दुसरी घटना वाशी सेक्टर १४ येथील एम.जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सीच्या बी विंगमध्ये घडली. रात्री दीडच्या सुमारास १९व्या मजल्यावर आग लागून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या सलग लागलेल्या आगीच्या घटनांमुळे नागरिकांत महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विशेषत: उंच इमारतींमधील फायर सेफ्टी सिस्टीम कार्यरत आहे का, गृहसंस्थांनी सेफ्टी ऑडिट केले आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आता महापालिका प्रशासन यावर कारवाई करते की बघ्याची भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.