घोडबंदर रोडवर भीषण अपघात; एका महिलेचा जागीच मृत्यू, दुचाकीचालक गंभीर जखमी


ठाणे : घोडबंदर वाहिनीवरील विजय गार्डन स्काय वॉक ब्रिजखाली, रविवार रात्री उशिरा सुमारे ११:३० वाजताच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. मुंबई फ्युजन वाइन अँड डाईन पार्टीहून परतणाऱ्या एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकल क्रमांक MH04/GQ-0353 वर स्वार असलेले दुचाकीचालक मनोज जयमंगल ठाकूर आणि त्यांच्या पाठीमागे बसलेली स्वाती हे दोघे मुंबई फ्युजन वाइन अँड डाईन पार्टीहून परतत होते. विजय गार्डन स्काय वॉक ब्रिजच्या खाली, घोडबंदर वाहिनीवर त्यांच्या दुचाकीला एका भरधाव अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली.


या धडकेमुळे दुचाकीवरून खाली पडलेली महिला, स्वाती, गाडीच्या टायरखाली आल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तिचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी आणि शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवला आहे.


दुचाकी चालक मनोज जयमंगल ठाकूर यांच्या हाताला गंभीर फ्रॅक्चर झाले आहे. अपघातानंतर लगेचच स्थानिक नागरिक आणि तेथून जाणाऱ्या पोलिसांच्या मदतीने त्यांना तातडीने ऑस्कर हॉस्पिटल, वडवली येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे, परंतु त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


दुचाकीला धडक देणारे वाहन अपघात होताच घटनास्थळावरून पळून गेले, त्यामुळे ते नेमके कोणते वाहन होते, हे समजू शकलेले नाही.


या अपघाताची नोंद घेऊन पोलिसांनी तातडीने पंचनामा केला. अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या भागात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्थानिक नागरिकांकडून माहिती घेऊन अज्ञात वाहनाचा व त्याच्या चालकाचा कसून शोध सुरू आहे.


Comments
Add Comment

अमरावतीत सलग २५ तासांत १५ हजार ७७३ डोसे !

विख्यात शेफ विष्णू मनोहर यांचा विक्रम अमरावती : विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती शहरात सलग २५ तासांत एकूण

प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये ५१ टक्के मतांचा संकल्प करा - बावनकुळे

नागपूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक सर्कल मध्ये ५१ टक्के मते मिळतील असा संकल्प करा, असे आवाहन

मुंबईसह विविध ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

ठाणे : मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष

पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू, अपघाताने २३ वाघांचा मृत्यू

चंद्रपूर : मागील पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात नैसर्गिक मृत्यू असले तरी,

शनिवार वाड्यावर नमाज पठण, निषेधासाठी भाजपच्या नेतृत्वात हिंदुत्ववाद्यांचे आंदोलन

पुणे : शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून

शनिवार वाड्यात नमाज पठण? ऐन दिवाळीत पुण्यात वादाची ठिणगी !

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार