मोहित सोमण:सकाळच्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. रिलायन्सने आपल्या दुसऱ्या तिमाहीतील निकाल शनिवारी जाहीर केले होते. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर १४.३% एकत्रित नफा (Consolidate d Profit) झाला होता जो इयर ऑन इयर बेसिसवर १४.३% वाढल्याने गेल्या वर्षीच्या १९३२३ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत वाढत २२०९२ कोटींवर पोहोचला होता. त्यामुळेच सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्या कलात शेअर ३% पर्यंत उसळला होता. सकाळी १०. ४५ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर ३.३२% उसळत १४६३.९० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत असल्याने तो नव्या इंट्राडे उच्चांकावर (All time High) वर पोहोचला आहे. तज्ञांच्या मते, 'रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत चांग ली कामगिरी केली आहे, एकूण महसूलात ९.९% वाढ होऊन तो वर्षभरात २८३,५४८ कोटी ($३१.९ अब्ज) झाला आहे. कंपनीच्या विविध पोर्टफोलिओमध्ये, ज्यात जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड (JPL), रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) आणि ऑइल टू के मिकल्स (O2C) यांचा समावेश आहे, या वाढीला हातभार लावला आहे. उद्योगातील आघाडीच्या ग्राहक वाढीमुळे, प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) मध्ये सातत्यपूर्ण सुधारणा आणि डिजिटल सेवा ऑफरिंगमध्ये सतत वाढ झाल्यामुळे JPL महसूल वर्षानु वर्षे १४.९% वाढला आहे. RRVL महसूल वर्षानुवर्षे १८% वाढला आहे, ज्यामध्ये उपभोगाच्या बास्केटमध्ये, विशेषतः किराणा आणि फॅशनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे अनुक्रमे २३% आणि २२% वाढीसह बाजारपेठेतील आघाडीची कामगिरी झाली आ हे.' याच कारणामुळे आज गुंतवणूकदारांनी शेअरला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
मात्र दुसरीकडे, ही तेजी आणखी सुरू राहण्याची अपेक्षा व्यक्त करताना चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया म्हणाले आहेत की,'रिलायन्सच्या शेअरची किंमत १४६० रुपयांवर अडथळा आणत आहे. या प्रतिकारापेक्षा वर गेल्यावर, सेन्सेक्स हेवी वेट लवकरच प्रत्येकी १५०० रुपयांच्या पातळीला स्पर्श करू शकते. म्हणून, ज्यांच्या पोर्टफोलि ओमध्ये आरआयएलचे शेअर्स आहेत त्यांना १४२५ रुपयांच्या पातळीवर स्टॉप लॉस राखून शेअर धरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रिलायन्सचे शेअर्स १५५१ रुपयां च्या आयुष्यातील उच्चांकापासून १०० रुपयांपेक्षा कमी अंतरावर असल्याने नवीन शिखरावर पोहोचू शकतील का, यावर सुमित बगडिया म्हणाले, १४६० रुपयांवर ठेवलेला तात्काळ प्रतिकार हा महत्त्वाचा घटक आहे. जर स्टॉक बंद होताना या अडथळ्यापेक्षा वर गेला आणि १५०० रुपयांना स्पर्श केला, तर आपण आरआयएलचे शेअर्स नवीन शिखर गाठतील अशी अपेक्षा करू शकतो.' असे ते म्हणाले आहेत.
रिलायन्सच्या तिमाही निकालावर,'रिलायन्सने आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत O2C, जिओ आणि किरकोळ व्यवसायांच्या मजबूत योगदानामुळे चांगली कामगिरी केली. एकत्रित EBITDA ने वार्षिक आधारावर १४.६ टक्के वाढ नोंदवली, जी चपळ व्यवसा य ऑपरेशन्स, देशांतर्गत-केंद्रित पोर्टफोलिओ आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक वाढ दर्शवते' अशी प्रतिक्रिया कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दिली होती.
कंपनीने आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत १८१६५ कोटी रुपयांचा एकत्रित करोत्तर नफा (Consolidated Profit after tax PAT) नोंदवला. गेल्या वर्षीच्या १६५६३ कोटी रुपयांपेक्षा तुलनेत तो १०% जास्त प्राप्त झाला आहे. कामकाजातून मिळणाऱ्या महसू लात (Revenue from Operations) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर १०% वाढून २.५९ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो २.५१ लाख कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा जास्त मिळाला. आकडेवारीनुसार, तिमाहीत एकूण महसूल २.८३ लाख कोटी रुपये होता, तर ईबीटा ( करपूर्व कमाई EBITDA) १५% वाढून ५०३६७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ऑपरेटिंग मार्जिन देखील गेल्या वर्षीच्या १७% च्या तुलनेत १७.८% पर्यंत वाढले आहे. क्रमिक आधारावर, जून तिमाहीत करोत्तर नफा २६९९४ कोटी रुपयांवरून ३३% कमी झाला, तर महसूल ४% कमी झाला. तेल-ते-रसायन क्षमता विस्तार, जिओची डिजिटल पायाभूत सुविधा, किरकोळ वाढ आणि कंपनीच्या महत्त्वाकांक्षी न्यू एनर्जी प्रकल्पांमध्ये सतत गुंतवणूकीमुळे भांडवली खर्च (Capital Expenditure) ४००१० कोटी रुप यांवर झाला होता असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
बहुतांश ब्रोकरेजने मोठ्या प्रमाणात निकालाचे समर्थन केले आहे. रिलायन्स शेअर्समध्ये शनिवारपासूनच तेजीचा अंदाज कायम त्यांनी ठेवला होता . एचडीएफसी सिक्युरिटीजने डिजिटल, रिटेल आणि रिफायनिंग व्यवसायांमध्ये स्थिर कामगिरी आणि तेल-ते-रसा यन विभागातील मार्जिन रिकव्हरीचा उल्लेख करून १६८५ रुपयांच्या लक्ष्य किमतीसह (Target Price TP) बाय रेटिंगचा पुनरुच्चार केला.
नोमुरा ब्रोकिंग रिसर्चने १७०० रुपयांच्या लक्ष्यासह 'बाय' रेटिंग देखील कायम ठेवले आहे. मजबूत रिटेल कामगिरीमुळे कमाईवर थोडासा फरक नोंदवला असे त्यांनी सांगितले. ब्रोकरेजने त्यांचे आर्थिक वर्ष २६ आणि आर्थिक वर्ष २७ च्या ईबीटा (EBITDA) अंदा ज अनुक्रमे ४% आणि १२% ने वाढवले आणि स्टॉकसाठी न्यू एनर्जी व्यवसायाचे स्केल-अप, संभाव्य जिओ टॅरिफ वाढ आणि २०२६ च्या पहिल्या सहामाहीत जिओचा संभाव्य आयपीओ. नजीकच्या जवळच्या काळातील हे नवे ट्रिगर्स जाहीर केले आहेत.