फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी फटाक्यांच्या किमती तब्बल २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळे फटाके फोडून दिवाळी साजरी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या होलसेल बाजारात किरकोळ खरेदीदारांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. लहान-मोठे फटाके खरेदीसाठी बाजारात उपलब्ध झाले आहेत. मात्र दरवर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांचे उत्पादन कमी झाल्याने याचा फटाक्यांच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे.


दिवाळीच्या पाच ते सहा महिने अगोदर फटाके निर्मितीस प्रारंभ होतो. यंदा फटाके निर्मितीचे केंद्र असलेल्या तमिळनाडूमधील शिव काशी येथे अतिवृष्टी झाली. त्यामुळे फटाके निर्मितीमध्ये अडचणी आल्या. फटाके सुकण्यासाठी ऊन गरजेचे असते. मात्र यंदा तेथे पावसामुळे फटाके सुकवण्यात अडचण निर्माण झाली. यामुळे तेथील कारखानदारांनी उत्पादन बंद ठेवले होते. परिणामी देशात फटाक्यांची टंचाई निर्माण झाली असल्याचे, होलसेल विक्रेते राहुल घोणे यांनी सांगितले.कच्चे साहित्य महाग झाल्यानेही फटाक्यांच्या किमतीमध्ये सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. यातच फटाक्यांची वात तयार करणाऱ्या नागपूर येथील कंपनीला आग लागली होती. त्याचा फटाक्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. यातच वातेची किंमत १० टक्क्यांनी वाढल्याचा परिणाम म्हणून फटाक्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. माल कमी आल्याने फटाक्यांच्या किमतीवरही याचा परिणाम झाल्याचे घोणे म्हणाले.


‘पॉप पॉप’ फटाक्याला मागणी
दरवर्षी फटाके बाजारात रंगीबेरंगी, विविध आवाज करणारे फटाके येतात. लहान मुलांना आकर्षक ठरणारे फटाके यंदाही बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये लहान मुलांच्या आवडीच्या ‘पॉप पॉप’ फटाक्याला अधिक मागणी आहे. या फटाक्याच्या किमतीमध्येही वाढ झाली असल्याचेही घोणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबईतील २५२ कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा: सलीम शेखच्या कबुलीजबाबाने खळबळ

मुंबई : देशभरात खळबळ माजवणाऱ्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठा धागा मिळाला

घाटकोपरमध्ये रस्ता रुंदीकरणातील अडथळा झाला दूर

बाधित २४ बांधकामांवर झाली अखेर कारवाई मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते

उत्तर पश्चिम जिल्ह्यात महायुतीचे ३२ ते ३३ नगरसेवक निवडून आणणार

भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड ज्ञानमूर्ती शर्मा यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई (सचिन धानजी) : उत्तर पश्चिम लोकसभा

लाडकी बहीण योजनेची वेबसाईट होत आहे अपग्रेड

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा सोळावा

दहिसरच्या राजकारणात उलथापालथ, वॉर्ड क्रमांक १ घोसाळकर कुटुंबाच्या आवाक्याबाहेर!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण राजकारणात हालचाली सुरू झाल्या आहेत. दहिसरमधील

शीतल म्हात्रे यांचा मोठा निर्णय : महापालिका निवडणूक लढवणार नाही, आमदारकीवर लक्ष केंद्रित!

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.