मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा यासारख्या सणांमध्ये रेल्वे तिकिटे मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय टपाल विभागाने रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने पोस्ट ऑफिसमधून ट्रेन तिकिटे बुक करण्याची परवानगी देली आहे.
रेल्वे स्टेशन किंवा आरक्षण काउंटर नसलेल्या लोकांसाठी तिकीट बुकिंग सोपे होणार आहे. ही नवीन प्रणाली सणांच्या वेळी प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आणि ग्रामीण भागात प्रवास सोयीस्कर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते. भारतीय टपाल विभागाने रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने देशभरातील ३३३ टपाल कार्यालयांमध्ये तिकीट बुकिंग सेवा सुरू केली आहे. यापैकी बहुतेक टपाल कार्यालये ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागात आहेत. या टपाल कार्यालयांमध्ये पीआरएस टर्मिनल सुसज्ज आहेत. ज्याद्वारे रेल्वे तिकिटे बुक केली जातात. railway-tickets-post-office या नवीन प्रणालीअंतर्गत, प्रवासी स्लीपर, एसी आणि जनरलसह सर्व वर्गांसाठी तिकिटे बुक करू शकतात. ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी ही सुविधा दिलासा देणारी असणार आहे.