Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप पावसाचे संकेत कायम आहेत. राज्यात कोकण किनारपट्टीचा काही भाग वगळता उर्वरित भागांमध्ये मात्र सध्या 'ऑक्टोबर हीटचे' (October Heat) चटके बसत आहेत. मान्सूनने निरोप घेतला असला तरी, यावर्षी दिवाळीच्या आसपासही पावसाचा फटका बसण्याचा धोका कायम आहे. दक्षिणेकडे तयार झालेल्या 'सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे' (Cyclonic Circulation) ही परिस्थिती उद्भवली असून, पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकणातील सिंधुदुर्ग, तसेच सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने 'यलो अलर्ट' (Yellow Alert) वर्तवला आहे. याव्यतिरिक्त, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक ठिकाणीही विजांसह पाऊस कोसळू शकतो. मात्र, राज्याच्या उर्वरित भागात उन्हाचे चटके कायम असतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.



मुंबईत पावसाला ब्रेक, पण 'ऑक्टोबर हीट'चा कहर


सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचे संकेत असले तरी, मुंबई शहर आणि उपनगरात आज पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
मुंबईमध्ये आज कमाल तापमान सुमारे ३३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दिवसभर दमट हवेमुळे (Humid Weather) नागरिकांना उकाडा (Sultry Heat) जाणवेल आणि घामाच्या धारा वाहू शकतात. ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही आज कोरडे हवामान (Dry Weather) कायम असेल. दुसरीकडे, पालघर जिल्ह्यामध्ये मात्र आज आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पालघरच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरींची शक्यता असली तरी, मुसळधार पाऊस कोसळणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.



पुढील ४८ तास महत्त्वाचे


सध्या राज्यातील हवामानाबद्दल हवामान तज्ज्ञांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. त्यांच्या माहितीनुसार, राज्यात पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुढील ७ दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे. दक्षिण-पूर्व अरबी सागरात 'सायक्लोनिक सर्क्युलेशन' (Cyclonic Circulation) अजूनही कायम आहे आणि याचा परिणाम म्हणून आजही दक्षिणेकडील राज्यांमध्ये वादळाचा धोका कायम आहे. महाराष्ट्राला या वादळाचा थेट धोका नसला तरी, राज्यातील हवामान वेगाने बदलू शकते. पुढील ४८ तासांत तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र लक्ष्यद्वीपकडून पश्चिम बंगालच्या दिशेने पुढे सरकणार आहे. या बदलांमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १९ ऑक्टोबर रोजीही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. या भागांसाठी हवामान विभागाने 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी केला आहे. यामुळे, यंदाची दिवाळीदेखील पावसातच जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, ज्यामुळे नागरिकांच्या उत्साहावर विरजण पडू शकते.

Comments
Add Comment

ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड, पेमेंट अडकले? रिफंडसाठी ‘ही’ पद्धत अवलंबा.

दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

आता पोस्ट ऑफिसमध्येही रेल्वे तिकीट मिळणार

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा यासारख्या सणांमध्ये रेल्वे तिकिटे मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी

मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी

मुंबई  : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २४०० कोटी रुपयांच्या मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी दिली

मुंबईत जलवाहतुकीत नवी क्रांती! ना लाटांचे धक्के, ना आवाज मुंबईत येतेय भविष्याची ‘कॅन्डेला’ बोट

कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानाने युक्त बोटी लवकरच मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रात दाखल होणार आहेत.

दिवाळीच्या तोंडावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, नागरिकांचा प्रवास होणार उशिराने

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार, १९ ऑक्टोबर रोजी