तुम्ही पंतप्रधान होण्याच्या लायकीचे नाही; अमेरिकन गायिकेने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला अमेरिकन पॉप गायिका मेरी मिलबेन यांनी 'X' (ट्विटर) वरून जहाल प्रत्युत्तर दिले आहे.


राहुल गांधी यांनी अलीकडेच, "पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात आणि उपेक्षा होऊनही त्यांचे अभिनंदन करत राहतात," असा आरोप केला होता.



मिलबेन यांचा खरमरीत पलटवार


राहुल गांधींना थेट लक्ष्य करत मिलबेन यांनी लिहिले, "तुमचे म्हणणे चुकीचे आहे, राहुल गांधी. पंतप्रधान मोदी हे ट्रम्प यांना घाबरत नाहीत. मोदी हे दीर्घकालीन धोरणांची समज असलेले आणि अमेरिका व भारत यांच्यातील मुत्सद्देगिरीचे (Diplomacy) उत्तम नेतृत्व करणारे नेते आहेत."


मोदींच्या निर्णयाचे समर्थन करताना मिलबेन पुढे म्हणाल्या, "जसं ट्रम्प नेहमी अमेरिकेच्या हितासाठी निर्णय घेतात, तसंच मोदीही भारताच्या फायद्यासाठी निर्णय घेत आहेत. राष्ट्रप्रमुख हेच करतात—जे त्यांच्या देशासाठी योग्य आहे."



"तुम्ही पीएम होण्यास पात्र नाही"


मिलबेन इथेच थांबल्या नाहीत. राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्या म्हणाल्या, "तुमच्याकडून अशा प्रकारच्या नेतृत्वाच्या समजुतीची अपेक्षा नाही, कारण तुम्ही भारताचे पंतप्रधान होण्याची अर्हता किंवा तीव्र बुद्धिमत्ता गाठलेली नाही."


त्यांनी राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याची खिल्ली उडवत म्हटले, "तुम्ही 'आय हेट इंडिया' टूरवर गेला आहात, ज्याचे एकमेव प्रेक्षक तुम्ही स्वतः आहात. त्यामुळे चांगलं होईल की तुम्ही परत याल."


राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर आरोप करताना ट्रम्प यांच्याकडून 'ऑपरेशन सिंदूर'वरील विधानाला विरोध न करणे, गाझा शांतता करारातून माघार घेणे आणि रशियन तेल खरेदीवर ट्रम्प यांना निर्णय जाहीर करण्याची संधी देणे असे पाच मुद्दे उपस्थित केले होते.


या पार्श्वभूमीवर, मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक करणाऱ्या मेरी मिलबेन यांनी थेट राहुल गांधींवर निशाणा साधला.


मेरी मिलबेन या अमेरिकन पॉप गायिका आहेत. २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले असताना, एका खास कार्यक्रमात मेरी मिलबेन यांनी मोदींच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले होते. त्याआधी त्यांनी ‘जन गण मन’ हे भारताचे राष्ट्रगीत गायले होते आणि मोदींच्या अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक आहे आणि त्या अनेक वेळा त्यांची स्तुती करताना दिसल्या आहेत.

Comments
Add Comment

‘एक्स’वर महिलांचे आक्षेपार्ह फोटो, 'एआय'च्या गैरवापराबद्दल खासदारांचं मोदी सरकारला पत्र!

नवी दिल्ली : शिवसेना (उबाठा)च्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकतेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि

तिरुपती गोविंदराजस्वामी मंदिरात मद्यपीचा धिंगाणा

तिरुपती : मद्याच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने तिरुपतीमधील श्री गोविंदराजस्वामी मंदिरात धिंगाणा घातल्याचा

'भाजपकडे पाहून संघाचे आकलन करणे चूक'

भोपाळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गणवेशाचा वापर करण्यात येत असला आणि शारीरिक कसरतींना

विद्यार्थ्यांना दंडाऐवजी समाजसेवा करण्याचा न्यायालयाचा आदेश; जेईई मेन्स उत्तरपत्रिका फेरफार प्रकरण

नवी दिल्ली : संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई मेन्स) २०२५ च्या उत्तरपत्रिकेत फेरफार केल्याचा आरोप असलेल्या दोन

Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा थरकाप! दोन चकमकीत १४ जणांचा खात्मा; मोस्ट वॉन्टेडसह २० जणांचे आत्मसमर्पण

रायपूर : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी पुकारलेल्या युद्धाला शनिवारी मोठे यश आले. सुकमा आणि

Tamilnadu Shocker : भयंकर! घराला बाहेरून कडी लावून जोडप्याला जिवंत जाळले अन्... तिरुवनंतपुरममधील धक्कादायक घटना

तिरुवनंतपुरम : तामिळनाडूतील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातून एक अत्यंत क्रूर घटना समोर आली आहे. चेंगगम जवळील