वसुबारस २०२५; तिथी, पूजा विधी, कालावधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

हिंदू धर्मातील वसुबारस या सणाला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे. महाराष्ट्र आणि गुजरातसह देशाच्या विविध भागांत हा सण श्रद्धा व भक्तिभावाने साजरा केला जातो. वसुबारसला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गाईंची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. आश्विन महिन्यातील वद्य द्वादशीला हा सण साजरा केला जातो. यंदा वसुबारस कधी आहे? कोणत्या मुहूर्तावर पूजा करावी? पूजा कशी करावी? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...



वसुबारस 2025 कधी आहे?


यंदा 17 ऑक्टोबर (शुक्रवार) 2025 रोजी वसुबारस आहे.



वसुबारस 2025 तिथी आणि मुहूर्त


द्वादशी तिथीस 17 ऑक्टोबर सकाळी 11:12 वाजता प्रारंभ होणार आहे.
द्वादशी तिथी 18 ऑक्टोबर दुपारी 12:18 वाजता समाप्त होणार आहे.
पूजनाचा मुहूर्त (प्रदोष काळ) : संध्याकाळी 6.14 वाजेपासून ते रात्री 8.42 वाजेपर्यंत आहे. यानुसार पूजा करण्यासाठी एकूण 2 तास 28 मिनिटांचा कालावधी मिळणार आहे.



वसुबारसची पूजा कशी करावी?


वसुबारसच्या दिवशी सवत्स गायीची म्हणून गायीसह वारसाची पूजा करण्याची परंपरा आहे.
तुमच्या घरामध्ये गाय-वासरू असेल तर त्यांना आंघोळ घालून त्यांचे औक्षण करावे. पिवळ्या रंगाचे वस्त्र आणि फुले त्यांना अर्पण करा.
तुमच्याकडे गाय वासरू नसतील तर एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन पूजा करू शकता. तेही शक्य नसेल तर गाय आणि वासराच्या मातीच्या मूर्तीची पूजा करावी. संध्याकाळी शुभ मुहूर्तावर पूजा-आरती करावी.
गायीला हिरवा चारा, चणे, मोड आलेले मूग आणि गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा.



वसुबारसच्या दिवशी या दोन गोष्टी करुन पाहा


ज्योतिषशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ शिरीष कुलकर्णी यांच्या मते, तुमच्या आसपास गोशाळा असल्यास तिथे मदत करणे फार शुभ मानले जाते, कारण काही लोक नि:स्वार्थ मनाने गाय आणि वासरांचे जीव वाचवतात. याशिवाय, एखाद्या गरजवंताला फराळ, अन्न किंवा अन्य आवश्यक वस्तू दान केल्यासही धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या मोठा पुण्याचा लाभ होतो.

Comments
Add Comment

फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांना आजपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार

यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त रकमेचा दंड मुंबई  : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

CSMT परिसरात सापडलेल्या त्या बॅगेत नेमकं काय सापडलं ?

मुंबई : देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षेची परिस्थिती अधिक ताणलेली असताना, मुंबईत आज पुन्हा एकदा संशयास्पद

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा