आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ‘आर्थिक आधार’

मुंबई : सात वर्षांची देवांशी गेल्या अनेक महिन्यांपासून यकृताच्या गंभीर आजाराशी झुंज देत होती. डॉक्टरांनी अखेर ‘यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया’ हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. तसेच उपचारासाठी २० लाख रूपये खर्च येणार असल्याचे सांगितले. मात्र, भाजीपाला विक्रीचा छोटा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबापुढे या उपचाराचा खर्च परवडणारा नव्हता. या कठीण काळात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष’चा कुटूंबीयांना आर्थिक आधार मिळाला. तसेच देवांशीच्या आईने तिला यकृत दिल्यानंतर तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.


वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील वरूड (बु) येथे राहणारे रवींद्र गावंडे हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मागील अनेक दिवसांपासून त्यांची मुलगी देवांशी पोटदुखी, ताप, मळमळ होणे आदींमुळे सतत आजारी पडत होती. पालकांनी सुरूवातीला मंगरूळपीर आणि अकोला येथे तिच्यावर उपचार केले. परंतु तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अखेर तिला नागपूर येथे हलविण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर, तज्ज्ञ डॉक्टरांनी तिचे यकृत गंभीर स्वरूपात बाधित झाल्याचे निदान केले. तसेच यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया’ गरजेचे असल्याचे सांगितले. शस्त्रक्रियेसाठी २० लाख रुपये खर्चाचा अंदाज त्यांनी वर्तविला होता.


दरम्यान, देवांशीच्या वडिलांना मित्रांकडून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत माहिती मिळाली. त्यांनी कक्षाकडे धाव घेतली. त्यासोबतच समाज माध्यमावर मदतीकरिता आवाहन केले. कक्षाच्या पुढाकाराने देवांशीवर पुढील उपचार मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये सुरू झाले. या उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, टाटा ट्रस्टच्या माध्यमातून उपचाराची मोठी रक्कम उभी राहिली. उर्वरित रक्कम इतर काही सामाजिक संस्था आणि गावकऱ्यांच्या वर्गणीतून गोळा करण्यात आली. देवांशीची आई मीनाक्षी गावंडे यांनी यकृत दिले. तिच्यावर ७ जुलै २०२५ रोजी यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.


देवांशीची प्रकृती आता स्थिर असून तिच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. आता तिला डिस्चार्ज मिळाला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष आणि टाटा ट्रस्टच्या मदतीमुळेच आमच्या मुलीचे प्राण वाचले, असे देवांशीचे वडील रवींद्र गावंडे यांनी सांगितले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार प्रत्येक गरजू, गरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी कक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. देवांशी त्याचे एक उदाहरण आहे. आम्ही वेळेवर मदत करू शकलो याचा आम्हाला आनंद आणि समाधान आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

Comments
Add Comment

राज्यातील १४३ बँकांवरील निर्बंध आरबीआयने हटविले

पुणे : भारतीय रिझर्व्ह बँकेने राज्यातील आर्थिक अडचणीत आलेल्या नागरी सहकारी बँकांवर सर्वसमावेशक निर्बंध (ऑल

जामीन न मिळाल्याच्या नैराश्यातून सहा बार डान्सर्सचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापुरातील धक्कादायक घटना! कोल्हापूर: कोल्हापुरातील एका महिला सुधारगृहात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.

ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे भाव घसरले, कांदा उत्पादक हवालदिल

लासलगाव : ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले

मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याच्या हवामान खात्याच्या सूचना

मुंबई : भारतीय हवामान विभागाने आणि आयएनसीओआयएस संस्थेने मुंबई शहर जिल्ह्यासह किनारी भागातील मच्छिमारांना

पुणे महापालिकेत ‘कनिष्ठ अभियंता’ भरतीसाठी सुधारित जाहिरात

मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग -३ या पदासाठी काही नवीन सामाजिक व

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी