पंतप्रधान मोदींनी आंध्रतील मंदिरात केली पूजा

नांद्याल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नांद्याल जिल्ह्यातील श्री भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानम येथे पूजा केली. मोदींनी पंचामृत (गायीचे दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे बनलेले पवित्र मिश्रण) वापरून रुद्राभिषेक केले. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण देखील त्यांच्यासोबत होते. मल्लिकार्जुन स्वामी मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि ५२ शक्तिपीठांपैकी एक आहे.





एकाच ठिकाणी ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ असणारे असे श्री भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानम हे देशातले एकमेव ठिकाण आहे. या मंदिराला भेट दिल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी श्री शिवाजी स्फूर्ती केंद्रालाही भेट दिली. या केंद्रात एक ध्यानगृह देखील आहे, ज्याच्या चार बाजूस प्रतापगड, राजगड, रायगड आणि शिवनेरी या चार किल्ल्यांची प्रतिकृती भिंतीवर बसवली आहे. मध्यभागी राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्यानस्थ अवस्थेतील पुतळा आहे. श्री शिवाजी स्मारक समितीद्वारे स्थापित हे ध्यानगृह १६७७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र मंदिरातील ऐतिहासिक भेटीच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आले आहे.


पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्फूर्ती केंद्राला भेट दिल्यानंतर कुर्नूलला जातील आणि वीज, संरक्षण, रेल्वे आणि पेट्रोलियम सारख्या क्षेत्रांशी संबंधित अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. याशिवाय, पंतप्रधान 'सुपर जीएसटी - सुपर सेव्हिंग्ज' या एका जाहीर सभेला देखील संबोधित करतील.

Comments
Add Comment

शैक्षणिक संस्था, बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि क्रीडा संकुलात भटक्या कुत्र्यांना ‘नो एण्ट्री’

सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश नवी दिल्ली : शैक्षणिक संस्था, बस-रेल्वे

तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीचे 'एटीसी' कोलमडले! दिल्लीच्या एटीसी बिघाडाचा फटका मुंबईला!

नवी दिल्ली: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि उत्तर भारतातील अनेक ठिकाणी एअर ट्रॅफिक

PM Modi : बिहारला नको 'कट्टा सरकार'! पंतप्रधान मोदींचा महाआघाडीवर 'दुतोंडी, गुंड' म्हणत जोरदार हल्लाबोल

औरंगाबाद : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी औरंगाबाद येथील एका

Delhi Airport : ATC सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड; दिल्ली विमानतळावर उड्डाणांना विलंब; प्रवाशांना मनस्ताप

नवी दिल्ली : देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) गुरुवारी

४१६ वर्षांत ४१६ वेळाच उघडले कार्तिकेयाचे मंदिर

ग्वालियर : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर, राज्यातील एकमेव भगवान कार्तिकेय स्वामी मंदिराचे दरवाजे अखेर मंगळवारी

राजस्थानमध्ये लग्नसराईत २५ हजार कोटींची उलाढाल!

जीएसटी कौन्सिलने वस्तूंवरील कर कमी केल्याचा थेट परिणाम जयपूर : लग्न म्हटलं की संगीताचे सुस्वर, सजवलेला मंडप,