मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा ३१ हजार सानुग्रह अनुदान

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दीपावली - २०२५ प्रीत्यर्थ ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.


दीपावली – २०२५ करीता महानगरपालिका अधिकारी / कर्मचाऱयांना पुढीलप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी घोषित केला आहे. त्याचा क्रम, तपशील आणि सानुग्रह अनुदान रक्कम या क्रमाने माहिती पुढीलप्रमाणेः


१. महानगरपालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/-

२. अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारीः रुपये ३१,०००/-


३. महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकः रुपये ३१,०००/-


४. माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-


५. माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-


६. अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी- (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-


७. अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-


८. सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV): भाऊबीज भेट रुपये १४,०००/-


९. बालवाडी शिक्षिका / मदतनीस - भाऊबीज भेट रुपये ०५,०००/-


महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची

हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घ्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व

महात्मा फुलेंशी संबंधित फाईल मंत्रालयातून गायब; महसूल मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या सरकारी डॉक्युमेंटरीशी संबंधित महत्त्वाची फाईल गायब