Maharashtra Weather Update : पुढील ७२ तासांत राज्यावर कोणते मोठे संकट? प्रशासनाचा स्पष्ट इशारा; 'अति महत्वाचं काम' म्हणजे नेमकं काय?

काही दिवसांपूर्वीच राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा मोठा कहर आणि अतिवृष्टी अनुभवल्यानंतर, आता भारतीय हवामान विभागाने (IMD) पुन्हा एकदा धडकी भरवणारा अंदाज वर्तवला आहे. राज्याच्या अनेक भागांना, विशेषतः किनारपट्टीच्या प्रदेशांना, पुन्हा एकदा पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, संपूर्ण कोकण आणि गोवा येथे पुढील दोन दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात, लक्षद्वीपजवळ हवेची द्रोणीय स्थिती (Trough) निर्माण झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. या वादळी पावसासाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला असून, ही द्रोणीय स्थिती १९ ऑक्टोबरपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील या बदलामुळे कर्नाटक आणि केरळपर्यंत समांतर क्षेत्र निर्माण होणार असून, त्याचा थेट प्रभाव कोकण किनारपट्टीच्या भागात जाणवणार आहे. त्यामुळे, किनारपट्टीच्या भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



चिपळूणमध्ये सकाळपासून हलक्या सरी


रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराच्या हवामानात आता स्पष्टपणे बदल जाणवू लागले आहेत. आज सकाळपासूनच शहरात हलक्या सरींची सुरुवात झाली आहे. वातावरणातील या बदलांमुळे पुढील दोन दिवस राज्यात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. या संभाव्य तीव्र पावसाच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातील बदलांमुळे कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता असल्याने, जिल्ह्याच्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.



कोल्हार बुद्रुकमध्ये वीजपुरवठा खंडित


अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुक गावात आज विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे गावातील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून, नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. दुसरीकडे, रायगड जिल्ह्यामध्येही अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले भातपिक धोक्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी भातपिकाची कापणी केली आहे, त्या कापणी केलेल्या शेतीचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. या अवकाळी आणि वादळी पावसामुळे नागरिक आणि शेतकरी अशा दोघांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.



अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान; मदतीनंतरही शेतकरी संकटात


राज्याच्या विविध भागांत पावसाची तीव्रता पुन्हा वाढू लागली आहे. सध्या दक्षिण रायगड भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांचीही मोठी तारांबळ उडाली आहे. केवळ कोकण किनारपट्टीच नव्हे, तर राज्यातील इतरही अनेक भागांमध्ये पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली असली तरी, अनेक भागांत पाऊस इतका जास्त झाला की, शेतकऱ्यांची संपूर्ण शेतीच वाहून गेली आहे. त्यामुळे जाहीर झालेली मदत तुटपुंजी ठरत असून, पुन्हा सुरू झालेल्या या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे.

Comments
Add Comment

'UP पॅटर्न'चा धसका! नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या 'बुलडोझर ॲक्शन'ची जोरदार चर्चा

अवैध बांधकामे, गुन्हेगारी अड्डे जमीनदोस्त; "गुन्हेगारांना माफी नाही, कायदा सर्वांसाठी समान" – मुख्यमंत्र्यांचे

Devendra Fadanvis : ब्रेकिंग पुणे! केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्र्यांच्या मंचावर सापाचा शिरकाव; सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ

पुणे : पिंपरी-चिंचवडजवळच्या किवळे (Kiwale) येथील सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये आज दुहेरी

गुन्हेगारी स्टाईलने 'रिल्स' बनवणा-याला दिला पोलिसांनी दणका

पुणे : दिवाळीच्या उत्सवात सोशल मीडियावर विविध प्रकारच्या जाहिराती येत असतात. अनेकजण आपल्या व्यवसायाच्या

ई-केवायसीसाठी लाडक्या बहिणींसमोर अडचणींचा डोंगर!

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले

पूरग्रस्त सोलापूर आणि बीड जिल्ह्यांसाठी रिलायन्स फाउंडेशनकडून मदतीचा हात

सोलापूर : मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे त्रस्त झालेल्या सुमारे चार हजार

'महाभाग, गोंधळलेले लोक'; फडणवीसांनी विरोधकांना सोलून काढले!

शरद पवारांच्या अनुपस्थितीवरही ठेवले बोट; विरोधकांना सुनावले खडेबोल सोलापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस