मुंबई : शहरातील हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत आहे. मुंबईचा एकूण वायू गुणवत्ता निर्देशांक ९ ऑक्टोबरपर्यंत, १०५ वर होता आता तो तिप्पट वाढला असून १३९ च्या आसपास पोहोचला आहे. तसेच वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि देवनार येथे अनुक्रमे २२१ आणि २३५ वायू गुणवत्ता निर्देशांक नोंदवले गेले आहे. ज्यामुळे हवेच्या गुणवत्तेत सातत्याने घट होत असून येणाऱ्या हिवाळ्यात प्रदूषणाचे प्रमाण आणखी वाढून 'अत्यंत खराब' स्तरावर पोहोचू शकते.
हवामानशास्त्रज्ञ आणि वातावरण शास्त्रज्ञांनी मुंबईतील सध्याच्या हवामान घटनेला ला-निना हवामान पद्धतीचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. तसेच मान्सून काळात वारंवार झालेल्या पावसामुळे धूलिकण धुऊन निघाल्याने प्रदूषणाचे प्रमाण नियंत्रणात होते. मात्र, पावसाचे प्रमाण घटल्याने वाढलेले तापमान आणि स्थिर हवामानामुळे वातावरणात धूर व धूळ साचू लागले आहेत.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, वाऱ्याच्या दिशेत झालेला बदल आणि सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे निर्माण होणारी धूळ, तसेच आगामी दिवाळीतील फटाक्यांचा धूर या कारणांमुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावण्याची
शक्यता आहे