प्रतिनिधी: एनपीसीआयने आपली जागतिक घौडदौड सुरू ठेवत जपानी कंपनीसोबत मोठा करार केला आहे. त्यामुळे आगामी काळात युपीआय व्यवहार जपानमध्ये देखील करता येणार आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्ताराचा हा प्रवास सुरू ठेवत, एन पीसीआयने इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड (NIPL) ने आता पूर्व आशियाई द्वीपसमूहांमध्ये युपीआय पेमेंट प्रणाली सक्षम करण्यासाठी जपानी आयटी कंपनी एनटीटी (NTT) बरोबर डेटा सोबत करार केला आहे. नुकतेच ग्लोबल फिनटेक फेस्टिवल (GFF) २०२५ दरम्यान एनपीसीआयने (National Payments Corporation of India NPCI) युपीआय विषयक नवीन उपक्रम व नव्या उत्पादनाचे अनावरण केले होते.या सहकार्याचा उद्देश जपानमधील व्यापारी आउटलेटमध्ये UPI स्वीकृती सक्षम करणे आहे ज्यामुळे भा रतीय पर्यटकांना त्यांच्या विद्यमान युपीआय अँपद्वारे QR कोड स्कॅन करून जलद आणि सुरक्षित पेमेंट करता येईल.या हालचालीमुळे प्रवाशांसाठी सोयी वाढतील आणि रोख रक्कम किंवा परदेशी कार्ड व्यवहारांवरील अवलंबित्व कमी होईल अशी अपेक्षा आहे अ से एनपीसीआयकडून सांगण्यात आले.
NTT ने देखील आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, सामंजस्य करार (MoU) जपानमधील भारतीय पर्यटकांसाठी युपीआय स्वीकृती सक्षम करण्यासाठी पाया म्हणून काम करेल. थोडक्यात, स्वदेशी डिजिटल पेमेंट नेटवर्क फक्त एनटीटी डेटाच्या ऑफर वा परणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पेमेंट करणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठीच सुरू केले जाईल.' भागीदारीचा एक भाग म्हणून,दोन्ही संस्था जपानमध्ये UPI च्या सक्षमीकरणासाठी इतर संधींचे संयुक्तपणे परीक्षण करतील. NTT डेटा ग्रुपची उपकंपनी NTT डेटा जपान देशभरातील अधिग्रहक, जारीकर्ता (Issuer) व्यापारी आणि एटीएमला जोडणारे देशातील सर्वात मोठे कार्ड पेमेंट प्रोसेसिंग नेटवर्क चालवते. या सामंजस्य करारांतर्गत, दोन्ही संस्था NTT डेटाद्वारे अधिग्रहित व्या पाऱ्यांमध्ये UPI एकत्रित करण्यासाठी एकत्र काम करतील, ज्यामुळे जपानमधील डिजिटल पेमेंट इकोसिस्टमचा आणखी विस्तार होईल.
जानेवारी ते ऑगस्ट २०२५ दरम्यान, २.०८ लाखांहून अधिक भारतीय पर्यटकांनी जपानला भेट दिली, जी २०२४ मधील याच कालावधीच्या तुलनेत ३६% वाढ आहे. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक व्यवहारात गैरसोय न होता व्यवहार सुलभीकरणासाठी हे पाऊल सामंज स्य कराराअंतर्गत देण्यात आले.
याविषयी बोलताना,'एनटीटी डेटासोबतचा सामंजस्य करार जपानमध्ये यूपीआय स्वीकृती सक्षम करण्यासाठी पाया रचतो.ही भागीदारी भारतीय प्रवाशांसाठी डिजिटल पेमेंट अनुभव सुधारण्यासाठी आणि सीमापार पेमेंट सुलभ क रण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे' असे एनपीसीआय इंटरनॅशनलचे एमडी आणि सीईओ रितेश शुक्ला म्हणाले. एनटीटी डेटा जपानचे पेमेंट प्रमुख मसानोरी कुरिहारा यांनी पुढे सांगितले की जपानमध्ये यूपीआय सुरू केल्याने भारतीय पर्यटकांसाठी खरेदी आणि पेमेंट अधिक सोयीस्कर होती ल आणि स्थानिक व्यापाऱ्यांना नवीन ग्राहक विभागांमध्ये प्रवेश करण्यास मदत होईल. जपानमध्ये यूपीआय भागीदारीची सुरुवात एनआयपीएलच्या चालू जागतिक विस्ताराचे आणि पूर्व आशियातील त्याच्या पहिल्या लाँचचे प्रतिनिधित्व करते, असे एनटीटी डेटाने ए का निवेदनात म्हटले आहे.
जपानच्या समावेशासह, एनआयपीएल( NIPL) ने आता सिंगापूर, फ्रान्स, नेपाळ, पेरू, भूतान, श्रीलंका यासह नऊ देशांमध्ये UPI स्वीकृती (Acceptance) २० आंतरराष्ट्रीय भागीदारांपर्यंत वाढवली आहे. फिनटेक महोत्सवात एनपीसीआयकडून काही प्रमुख लाँ चमध्ये एजंटिक AI पेमेंट्स, रिझर्व्ह पे, बँकिंग कनेक्ट, युपीआयI साठी ऑन-डिव्हाइस बायोमेट्रिक प्रमाणीकरण, IoT-सक्षम पेमेंट्सचे पायलट लाँच, इत्यादींचा समावेश होता. दरम्यान, ऑगस्टमध्ये २०१० कोटीच्या सर्वकालीन उच्चांकी पातळी गाठल्यानंतर सप्टें बरमध्ये भारतातील मासिक युपीआय व्यवहार २.५% कमी झाले आहेत जे आता १९६० कोटी झाले. तरीही, सप्टेंबर २०२४ मध्ये नोंदवलेल्या १५०० कोटी व्यवहारांपेक्षा व्यवहारांची संख्या ३१% वाढली आहे.