सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करावे. जिल्ह्याच्या भौगोलिक विस्ताराचा विचार करून त्या प्रमाणात बसेस देऊन परिवहन सेवा सक्षम करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.


मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस. टी. महामंडळाशी सबंधित विविध विषयांबाबत बैठक झाली. त्यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. बैठकीस आमदार निलेश राणे, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, वेंगुर्ला आणि कुडाळ आगाराला पाच बसेस देण्यात याव्यात. ओरोस येथील प्रवासी संख्या व शासकीय कार्यालये लक्षात घेता बस स्थानकाचा विस्तार करावा. बस स्थानकाचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर विकास करून प्रशस्त बसस्थानकाची निर्मिती करावी.


कार्यरत कर्मचारी संख्या आणि बसेसची संख्या लक्षात घेऊन नियोजन करावे. कर्मचाऱ्यांअभावी बसेस थांबून प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विभागीय नियंत्रक रिक्त पदावर अधिकारी देण्यात यावा, असे निर्देशही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

Comments
Add Comment

सिंधुदुर्गात वाड्या, रस्त्यांच्या जातीवाचक नावांऐवजी आता महापुरुषांची नावे

नावे बदलणारा राज्यातील पहिला जिल्हा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला प्रक्रियेत सावळागोंधळ

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी,

जिल्ह्यात २४ ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दि. २४ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण

या वर्षीही हापूसची चव उशिराच; आंबा बागायतदार चिंतेत !

लांबलेल्या पावसाचा कोकणातील आंबा उत्पादनावर परिणाम रत्नागिरी (वार्ताहर) : यंदा पावसाने मुक्काम वाढविला आहे. या

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा