ओंकार भोजने पुन्हा गाजवणार महाराष्ट्राची हास्यजत्रा

मुंबई : कोकणचा कोहिनुर असलेला हरहुन्नरी कलाकार म्हणजे 'ओंकार भोजने' पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत घर वापसी करणार आहे. लग्नमंडपात चिडणारा मामा, अगं अगं आई म्हणत स्वतःला बिचारा दाखवणारा मुलगा आणि रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा लाडका 'भोजन्या' पून्हा एकदा हास्यजत्रेचा हास्यमंच गाजवायला सज्ज झालाय.


हास्यजत्रा सोडल्यांनंतर मध्यंतरी ओंकार आपल्याला झी मराठीच्या चला हवा येऊद्या या कार्यक्रमात दिसला होता. त्यावेळी त्याने हास्यजत्रेतून विश्रांती घेतली होती. त्याने पुन्हा या कार्यक्रमात यावे अशी चाहत्यांची इच्छा होती. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा अखेर संपली असून ओंकार लवकरच हास्यजत्रेत दिसणार आहे.



ओंकारला जे पात्र मिळाले त्याला त्याने आपल्या कलेमधून जिवंत केले. म्हणूच तो प्रेक्षकांच्या जवळचा आणि लोकप्रिय झाला. त्याचं टायमिंग, त्याची संवादफेक, त्याचं सादरीकरण या सर्वांचच प्रेक्षकांनी आणि पाहुण्यांनी तोंडभरून कौतुक केलं. अंग अंग आई हे त्याचं विशेष गाजलेलं पात्र आणि साईन कॉस थिटा म्हणण्याच्या पद्धतीने प्रेक्षकांना नेहमीच पोट धरून हसायला भाग पाडले . मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार लवकरच हास्यजत्रेत झळकणार असून चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे.

Comments
Add Comment

वंदना गुप्ते यांना 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' जाहीर

मुंबई : मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वंदना

अलविदा ही मॅन

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. वयाशी संबंधित आजारांमुळे काही दिवसांपासून ते

‘द केरळ स्टोरी’ फेम अदाला मोठा धक्का; लाडक्या आजीचे निधन, महिनाभर सुरू होते उपचार

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री अदा शर्मा सध्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या दुःखातून जात आहे. ‘द केरळ स्टोरी’मुळे

अभिनेत्री श्रद्धा कपूर शूटिंगदरम्यान जखमी

मुंबई  : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,

रिंकू राजगुरुच्या 'आशा' सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरू तिच्या नवीन चित्रपटातून 'आशा' च्या माध्यमातून भेटीला येत आहे. याआधीही तिने

निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

जागतिक मराठी संमेलन गोव्यात ; ९ जानेवारीला देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन ; महेश मांजरेकर यांना जीवनगौरव