नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. वेस्ट इंडिज संघ दुसऱ्या डावात खेळ करत आहे. वेस्ट इंडिजने २०० धावांचा टप्पा पार केला असून त्यांचे २ गडी बाद केले आहेत.
भारतीय संघाने या सामन्यात पहिला डाव ५ बाद ५१८ धावांवर घोषित केला होता. यानंतर वेस्ट इंडिजने आपल्या पहिल्या डावात २४८ धावा के्या. भारताला पहिल्या डावाच्या आधारावर २७० धावांची आघाडी मिळाली आणि त्यांनी वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिला. टीम इंडियाने अहमदाबादमध्ये खेळवण्यात आलेल्या मालिकेत एक डाव आणि १४० धावांनी विजय मिळवला होता. शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया १-०ने पुढे आहे.
दिल्ली कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने पाच बाद ५१८ धावा करुन पहिला डाव घोषीत केला. नंतर विंडीजचा डाव २४८ धावांत आटोपला. फॉलोऑन मिळाल्यामुळे पुन्हा फलंदाजीसाठी आलेल्या वेस्ट इंडिजने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोन बाद १७३ धावा केल्या. अद्याप वेस्ट इंडिज ९७ धावांनी पिछाडीवर आहे. शाई होप ६६ आणि जॉन कॅम्पबेल ८७ धावांवर खेळत आहे. मोहम्मद सिराजने टी. चंदरपॉलला (१० धावा) शुभमन गिलकरवी झेलबाद केले तर अॅलिक अथानाझे सात धावा करुन वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला.
भारताने पहिल्या डावात पाच बाद ५१८ धावा केल्या आणि डाव घोषीत केला. भारताकडून यशस्वी जयस्वालने १७५, केएल राहुलने ३८, साई सुदर्शनने ८७, कर्णधार शुभमन गिलने १२९, नितीश रेड्डीने ४३, यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने ४४ धावांचे योगदान दिले. वॉरिकनने तीन आणि चेसने एक बळी घेतला.