एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी बोनस, संप टळला!

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध विभागातील कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला होता. मात्र, सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांना या यादीत स्थान नव्हते. त्यामुळे नाराज एसटी कर्मचारी संघटनांनी संपाचं इशारा दिला होता. आता सरकारने त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत बोनस जाहीर केला आहे, ज्यामुळे संप टळला असून कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. यामध्ये दिवाळी बोनस म्हणून प्रत्येकी ६००० रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


तसेच, १२,५०० रुपयांची उचल घेण्याची सुविधा कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय, प्रत्येक महिन्याला ६५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जो पुढील ४८ आठवड्यांपर्यंत लागू राहणार आहे.


एसटी महामंडळ अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत असून, वेळेवर पगार मिळण्यात अडथळे येत होते. अनेक वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सामावून घेण्याची मागणी सुरू आहे, मात्र त्यावर अजून तोडगा निघालेला नाही.


सरकारने दिवाळीपूर्वीच ही आर्थिक मदत आणि बोनस जाहीर करून कामगारांच्या रोषाला थोपवले आहे. त्यामुळे संभाव्य संप टळला असून, एसटी कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खरंच गोड ठरणार आहे.

Comments
Add Comment

Rajesh Aggarwal : राजेश अगरवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव, चार अधिकाऱ्यांची संधी हुकली

मुंबई : राजेश अगरवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सोमवार १ डिसेंबर २०२५ पासून पदभार स्वीकारणार आहेत.

महाराष्ट्रातील ७५ गावं स्मार्ट होणार; गावात सीसीटीव्ही, वाय-फाय, डिजिटल शिक्षण व्यवस्था उपलब्ध होणार

मुंबई : महाराष्ट्रातील गावांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाची गंगा पोहोचावी यासाठी राज्य सरकार अभिनव उपक्रम राबवत

एक्सप्रेस वे मुळे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांत होणार

सूरत : एक्सप्रेस वे मुळे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांत करता येईल. सर्व अडथळे दूर करून हा प्रकल्प लवकर पूर्ण

प्रारुप मतदार यादीवरील हरकती, सुचनांची गांभीर्याने दखल घ्या

महापालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

दुबार नावाच्या मतदारांकडून निवडणूक कर्मचारी,अधिकाऱ्यांच्या कामांत अडथळा

नागरिकांना सहकार्य करण्याचे महापालिका प्रशासनाचे आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाच्या

कांदिवलीत गुरुवारी पाणीबाणी

येत्या गुरुवारी ४ डिसेंबरला पाण्याचा वापर करा जरा जपून मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जलवितरण सुधारणा कामांतर्गत आर