आग्रा : जगातील सात आश्चर्यांमध्ये ज्या स्मारकाचा समावेश केला जातो त्या ताजमहालच्या परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करुन थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळवले. धूर येताच, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब टोरेंट पॉवर कंपनीला कळवले. वीजपुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला आणि दुरुस्तीचे काम सुरू झाले.
ताजमहालच्या दक्षिणेच्या प्रवेशद्वारातून २०१८ पासूनच पर्यटकांना प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे आग लागली त्यावेळी गर्दी नव्हती. अग्निशमन दल आणि एएसआयची पथके घटनास्थळी पोहोचली. यानंतर वेगाने कारवाई करुन आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आग नियंत्रणात आल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे.
आग लागल्याच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत ताजमहाल परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यामुळे धूर येताना दिसत आहे.