Diwali 2025 : Elite Marque कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली सलग ९ दिवसांची सुट्टी !

दिवाळीत ईमेल बंद ठेवा, मिठाई खा आणि निवांत झोपा – सीईओ रजत ग्रोवर यांचा सल्ला


नवी दिल्ली : दिवाळीच्या सणाला बहुतेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना २ - ३ दिवस सुट्टी देतात, पण Elite Marque या पब्लिक रिलेशन कंपनीने यंदा कर्मचाऱ्यांसाठी एक खास भेट दिली आहे. कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सलग ९ दिवसांची सुट्टी देण्याची घोषणा केली आहे, जी अनेकांना आश्चर्यचकित करणारी आणि आनंददायी ठरली आहे.


कंपनीचे संस्थापक आणि सीईओ रजत ग्रोवर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एक खास ईमेल पाठवला आहे. त्या ईमेलमध्ये त्यांनी लिहिले आहे, “या दिवाळीत ईमेल बंद ठेवा, रात्र हसत-खेळत वेळ घालवा, मिठाई खा आणि आरामात झोपा ” तसेच त्यांनी सुट्टीच्या काळात कोणताही ऑफिस ईमेल किंवा वर्क चॅट उघडण्यास मनाई केला आहे, म्हणजे कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ विश्रांती आणि कौटुंबिक वेळ मिळावा.


आजच्या कॉर्पोरेट युगात, जिथे अनेक कंपन्या वर्क फ्रॉम होम पॉलिसी कमी करत आहेत आणि कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये परत येण्याचे कडक नियम लागू करत आहेत, अशा काळात Elite Marque चा हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने खूप सकारात्मक आणि प्रेरणादायी मानला जात आहे.


कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने LinkedIn वर लिहिले की, “सगळेच वर्क कल्चरवर बोलतात, पण खरं वर्क कल्चर तेच जेथे कंपनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि आनंदाला प्राधान्य देते. Elite Marque ने आम्हाला आमच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याची संधी दिली, ही खरी दिवाळीची भेट आहे.”


सीईओ रजत ग्रोवर यांनी आपल्या संदेशात कर्मचार्‍यांना मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टिकोनातून विश्रांती घेण्याचे आवाहन केले आहे, ज्यामुळे ते सुट्टीनंतर ताज्या ऊर्जा आणि नवी प्रेरणा घेऊन कामाला परत येतील.


Elite Marque चा हा निर्णय इतर कंपन्यांसाठी एक उदाहरण ठरू शकतो की, वर्क-लाइफ बॅलन्स राखणं आणि कर्मचारी कल्याणाला महत्त्व देणं यामध्ये किती फरक पडतो.

Comments
Add Comment

भारताच्या मुलीची ऐतिहासिक कामगिरी! तिरंदाजी स्पर्धेत भारतीय एबल-बॉडी ज्युनियर संघात निवड

मुंबई: देणाऱ्याने देताना काहीतरी विचार केलाच असेल, असं आपण नेहमीच म्हणतो. मग ते सुख असो किंवा दु:ख... आणि याचा अनुभव

आयसिसच्या तीन अतिरेक्यांना अटक, गुजरात ATS ची धडक कारवाई

अहमदाबाद : गुजरात एटीएसने 'आयसिस'शी संबंधित तीन अतिरेक्यांना अटक केली आहे. हे अतिरेकी देशात मोठा घातपात करण्याची

'हे' आहे देशातील पहिले शाकाहारी शहर! जाणून घ्या सविस्तर

गुजरात: कोरोना काळानंतर जगात मासांहार करणाऱ्यांपेक्षा शाकाहारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. शाकाहारी जेवण

‘त्यांच्याकडून मुलांना पिस्तुल, तर आमच्याकडून लॅपटॉप’

पंतप्रधान मोदींचा विरोधी पक्षांवर घणाघात सीतामढी : ‘हे लोक स्वतःच्या मुलांना मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि

५ रुपयांत पोटभर जेवण!

दिल्लीत १०० 'अटल कँटिन' सुरू करण्याची घोषणा नवी दिल्ली: दिल्ली सरकारने शहरात १०० ठिकाणी 'अटल कँटिन' सुरू करण्याची

संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे आणि १९ डिसेंबरपर्यंत चालेल, अशी घोषणा संसदीय