मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे पर्यटक तरुणी ४० फूट खोल दरीत कोसळली

राजगड : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. त्यामुळे पर्यटकांची पळापळ झाली. संजीवनी माची परिसरात भ्रमंतीसाठी आलेल्या अंजली पाटील (वय 24) या युवतीवर हल्ला होताच ती घाबरून बचावाच्या प्रयत्नात सुमारे ४० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामुळे तिला मणक्यामध्ये फ्रॅक्चर झाले व हालचाल करणे अशक्य झाले.


या घटनेची माहिती मिळतात, वेल्हे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापनाने बचाव मोहिम सुरू केली. किल्ल्याचा परिसर दुर्गम व उताराचा असल्याने काळोखात ८-९ तासांपर्यंत धाडसी प्रयत्न करून अंजलीला सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर स्ट्रेचरच्या सहाय्याने तिला किल्ल्याच्या पायथ्याशी आणण्यात आले. तिला प्राथमिक उपचारासाठी वेल्हे आरोग्य केंद्रात नेऊन तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले. सुदैवाने, तिची प्रकृती आता स्थिर आहे.


धाडसी रेस्क्यू मोहिमेत तानाजी भोसले, वैभव भोसले, मनोज शिंदे, आकाश झोंबाडे, संजय चोरघे, संतोष जाधव, उत्तम पिसाळ, विक्रम बिरामणे आणि अनिल रेणुसे या सदस्यांनी सहभाग घेतला.


ट्रेकिंग करताना कशा प्रकारे सावधगिरी बाळगावी त्या संदर्भात रेस्क्यू टीमने दिलेल्या सूचना




  • योग्य पादत्राणे, पाणी व प्राथमिक उपचार साहित्य सोबत ठेवा.

  • मधमाश्या, साप किंवा अन्य वन्यजीव दिसल्यास घाबरून न जाता शांत राहा व सुरक्षित ठिकाणी जा.

  • अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमशी संपर्क साधा.

  • सुरक्षिततेसाठी नियम पाळा आणि सावध रहा.

Comments
Add Comment

PUC Certificate : सर्व वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! PUC साठी आता मोजावे लागणार 'इतके' रुपये; जाणून घ्या सविस्तर

मुंबई :  महाराष्ट्र परिवहन विभागाने राज्यातील वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच PUC

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार सरींचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार

Nagpur Gas Leak : नागपुरात मध्यरात्री खळबळ! गाढ झोपेत अचानक श्वास गुदमरला, गॅस गळतीने 40 जण रुग्णालयात

नागपूर : नागपूरमधील गोधणी परिसरात मध्यरात्री जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरिन वायूची गळती झाल्याने मोठी खळबळ

Breaking! अमरावतीच्या डफरिन रुग्णालयातील NICU विभागाला भीषण आग; 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात डफरिन रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला

Mazgaon Ganpati : मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीत अंडी फेकल्याचा आरोप; माझगावमध्ये तणाव, पोलिसांकडून तपास सुरू, पहा Video

मुंबई : मुंबईतील माझगाव परिसरात गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी आणि दगडफेक झाल्याच्या आरोपामुळे काही काळ

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग