मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर देखभाल व सुधारणा कामांसाठी मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर विविध देखभाल, सिग्नलिंग आणि यार्ड रीमॉडेलिंगसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही स्थानकांदरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात येणार असून, काही गाड्यांचे मार्ग बदलले जातील. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मध्य रेल्वेने कर्जत स्थानक व यार्डच्या पुनर्रचना कामासाठी कर्जत ते खोपोलीदरम्यान शनिवार, आज दुपारी १२:२० पासून ते रविवार, १२ ऑक्टोबर सायंकाळी ६:२० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घोषित केला आहे.


हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान रविवारी सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० या वेळेत अप आणि डाउन मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार आहे. या कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत ठाणे – वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.


पश्चिम रेल्वेवर देखील रविवारी, १२ ऑक्टोबरला सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत बोरिवली-राम मंदिर आणि राम मंदिर-कांदिवली स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमध्ये ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीची कामे केली जातील. यामुळे अंधेरी ते बोरिवलीदरम्यान अप जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. काही गाड्या रद्द होतील तर काही हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत वळवण्यात येणार आहेत.


रेल्वेच्या या तात्पुरत्या बदलांमुळे प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाच्या वेळा आणि मार्ग तपासून नियोजन करणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

कुंभमेळ्यासाठी झटपट पटापट भटजी व्हा फटाफट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विभागाकडून पूजाविधी आणि पौराहित्य शॉर्ट टर्म कोर्सला

महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; ठाण्यात भारतातील सर्वांत उंच व्हिवींग टॉवर, स्नो पार्क उभारणार

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल

महसूल विभागाचे ३ महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : महसूल विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले असून

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ३५ हजार ३६२ रुग्णांना २९९ कोटींची मदत - वर्षभरातील कामगिरी; मदतीचा ओघ वाढवण्यासाठी त्रिपक्षीय करार, आरोग्य योजनांचे एकत्रीकरण

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्व

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस