Thursday, March 26, 2026

AMFI Data: सप्टेंबरचे म्युच्युअल फंड आकडेवारी जाहीर, इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणूकीत घसरण तर सोन्याच्या ईटीएफ गुंतवणूकीत रेकॉर्डब्रेक अडीच पटीहून अधिक वाढ !

AMFI Data: सप्टेंबरचे म्युच्युअल फंड आकडेवारी जाहीर, इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणूकीत घसरण तर सोन्याच्या ईटीएफ गुंतवणूकीत रेकॉर्डब्रेक अडीच पटीहून अधिक वाढ !

मोहित सोमण: सप्टेंबर महिन्यात नवे कल हाती येत आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया (AMFI) सप्टेंबर महिन्यातील म्युच्युअल फंडांची आकडेवारी जाहीर केली आहे. यावेळी मात्र म्युच्युअल फंड आवक (Inflow) महिना बेसिसवर (MoM ) घटली आहे तर सोन्याच्या ईपीएफ म्युच्युअल फंड गुंतवणुकीत रेकोर्ड ब्रेक वाढ झाली आहे. माहितीनुसार इक्विटी म्युच्युअल फंडात गेल्या ऑगस्ट महिन्यातील तुलनेत सप्टेंबर महिन्यापर्यंत महिना बेसिसवर ९% घसरण झाली आहे तर सोन्याच्या गुंतवणूकीत गे ल्या  महिन्यातील तुलनेत मोठी वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात गोल्ड ईटीएफ गुंतवणूक २१८९ कोटी होती ती वाढत त्या आधीच्या महिन्यात ८३६३ कोटींवर पोहोचली आहे. वाढत असलेल्या अस्थिरतेमुळे इक्विटीपेक्षा गुंतवणूकदारांनी सोन्याच्या गुंतवणूकीत अ धिक प्राधान्य दिल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.

दुसरीकडे इक्विटी म्युच्युअल फंडातील लार्जकॅपमध्ये १८%, मिडकॅपमध्ये ४.५%, स्मॉलकॅपमध्ये १२.६%, फ्लेक्सीकॅपमध्ये ८.४% घसरण झाली आहे. गोल्ड ईटीएफ गुंतवणूकीत मात्र ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात २.८२ पट वाढ झाल्याचे आकडेवारीतून दि सून येत आहे. सप्टेंबर महिन्यात म्युच्युअल फंड निव्वळ आवक (Net Inflow) ४३१४६.३२ कोटी होती त्या मागील महिन्यात ५२४४२.७८ कोटी रुपये होती. विशेषतः लार्जकॅप आवक मागील महिन्यातील २८३४.८८ कोटींवरून सप्टेंबर महिन्यात २३१९.०४ कोटींव र घसरली होती.तर स्मॉल कॅप आवक मागील महिन्यातील ४९९२.९० कोटींच्या तुलनेत घसरत त्याआधीच्या महिन्यात ४३६२.९१ कोटींवर गेली आहे. फ्लेक्सीकॅप बाबतीत मागील महिन्यातील ७६७९.४० कोटींच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात ७०२९.२६ कोटींवर पो होचले आहे.

सप्टेंबर महिन्यात डेट फंडांमध्ये (Debt Fund) १.०१ लाख कोटींच्या जावक (Outflow) तुलनेत त्याआधीच्या ऑगस्ट महिन्यात कमी ७९७९.८३ लाख कोटी घसरण झाली होती. गेल्या महिन्यात ४९५०.८४ कोटी रुपयांच्या तुलनेत ओव्हरनाइट फंडमध्ये ४२७९.०० कोटी रुपयांची आवक झाली. ऑगस्टमध्ये १३३५०.०५ कोटी रुपयांच्या आवकच्या तुलनेत लिक्विड फंडमधून ६६०४२.३२ कोटी रुपयांची आवक झाली.सप्टेंबरमध्ये एसआयपी योगदान वाढून २९३६१ कोटी रुपये झाले, जे ऑगस्ट २०२५ मध्ये २८२६५ कोटी रुपये होते.हायब्रिड फंडमध्ये ९३९७.२२ कोटी रुपयांचा निधी आला, जो मागील महिन्यात १५२९३.६९ कोटी रुपयांचा होता. आर्बिट्रेज फंडांमधून या महिन्यात ९८८.२५ कोटी रुपयांचा निधी बाहेर गेला. ऑगस्ट महिन्यात या श्रेणीत ६६६६.५० कोटी रुपयांचा निधी आला. निष्क्रिय निधी श्रेणीत (Passive Fund Catagory) ऑगस्टमध्ये १९०५६.५१ कोटी रुपयांचा निधी आला, जो ११४३६.७९ कोटी रुपयांचा होता.

सप्टेंबर महिन्यात एनएफओद्वारे सक्रिय इक्विटीमध्ये एकूण निधी २७४ कोटी रुपये होता. इंडेक्स फंडांमध्ये सर्वाधिक एनएफओ आले, ज्यामध्ये महिन्यात चार लाँच झाले. ऑगस्ट महिन्यात गुंतवणूक २०५६ कोटी रुपये होती. सप्टेंबर महिन्यात विविध श्रेणींमध्ये एकू ण नऊ नवीन फंड ऑफरिंग्ज (New Fund Offer NFO आल्या, ज्यामध्ये १९५९ कोटी रुपयांचा निधी आला. मागील महिन्यात १० नवीन लाँचिंग्जमध्ये २८५९ कोटी रुपयांचा निधी आला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा