Kondhwa Search Operation : एटीएसचा कोंढव्यात शिरकाव! गल्लीबोळामध्ये झळकले आय लव मोहम्मदचे बॅनर, पोलीस तपास सुरू

पुणे : पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसर आज पहाटेपासूनच तपास यंत्रणांच्या छापामारीमुळे चर्चेत आला आहे. तपास यंत्रणांची एकीकडे छापेमारी सुरू असतानाच, दुसरीकडे याच परिसरात काही ठिकाणी अचानक झळकलेल्या बॅनरमुळे एक नवा आणि महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. कोंढवा परिसरामध्ये तपास यंत्रणांनी आज मध्यरात्रीपासूनच मोठी छापेमारी सुरू केली आहे. या कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही छापेमारी कशासंदर्भात आहे, याबद्दल अधिकृत माहिती नसली तरी, तपास यंत्रणांच्या हालचाली महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. तपास यंत्रणांची कारवाई सुरू असतानाच, कोंढव्यातील गल्लीबोळांमध्ये 'आय लव्ह मोहम्मद' (I Love Mohammad) लिहिलेले बॅनर झळकताना दिसत आहेत. या अचानक झालेल्या बॅनरबाजीमुळे पोलिसांसमोर एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. छापेमारी आणि ही बॅनरबाजी यांचा नेमका काही संबंध आहे का? याचा तपास करणे पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरले आहे. पोलीस या बॅनरबाजीच्या दिशेनेही तपास करण्याची शक्यता आहे. हे बॅनर कोणी लावले आणि त्यामागचा उद्देश काय आहे, याचा शोध घेतला जात आहे. सध्या कोंढव्यामध्ये तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे आणि बॅनरबाजीमुळे तणावपूर्ण शांतता असून, पोलीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.



गल्लीबोळात 'आय लव्ह मोहम्मद'चे बॅनर


पुणे पोलीस आणि एटीएसचे जवळपास हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोंढवा परिसरात तैनात करण्यात आले आहेत. तपास यंत्रणा रस्त्यांवर आणि गल्लोगल्ली फिरताना दिसत आहेत. काही संशयित लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. याच कोंढवा परिसरापासून काही अंतरावर असलेल्या एका सोसायटीमध्ये दोन वर्षांपूर्वी दहशतवादी राहत असल्याचे कारवाईत आढळून आले होते आणि ती जागा सील करण्यात आली होती. सध्या त्या ठिकाणीही पुणे पोलीस आणि एटीएसची छापेमारी सुरू आहे. एकीकडे तपास यंत्रणांची ही मोठी कारवाई सुरू असतानाच, दुसरीकडे कोंढव्याच्या गल्लीबोळांमध्ये 'आय लव्ह मोहम्मद' (I Love Mohammad) लिहिलेले बॅनर झळकताना दिसत आहेत. पोलीस ज्या रस्त्यांवर फिरत आहेत, त्याच रस्त्यांवर दोन ते तीन ठिकाणी हे बॅनर लावल्याचे निदर्शनास आले आहे. या बॅनरबाजीमुळे छापेमारी आणि बॅनर यांचा काही संबंध आहे का? असा सवाल उपस्थित होत असून, तसा संशय देखील व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी, ही बॅनरबाजी याच कारवाईच्या अनुषंगाने असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या बॅनरबाजीमुळे तपास यंत्रणांच्या कारवाईला अप्रत्यक्ष आव्हान देण्याचा प्रयत्न होतोय का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.



केंद्रीय यंत्रणांकडून १८ ठिकाणी संयुक्त 'सर्च ऑपरेशन'


पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसरात मध्यरात्रीपासून तब्बल १८ ठिकाणी मोठे आणि गुप्त 'सर्च ऑपरेशन' (Search Operation) सुरू करण्यात आले आहे. हे ऑपरेशन महाराष्ट्र पोलीस, पुणे पोलीस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा मिळून संयुक्तपणे राबवत आहेत, ज्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या कारवाईदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कोंढवा परिसराचा हा भाग यापूर्वीही चर्चेत होता. पुणे पोलिसांनी दोन वर्षांपूर्वीच एका बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना कोंढवा परिसरातून अटक केली होती. त्यावेळी देशातील संभाव्य दहशतवादी कट उधळण्यात तपास यंत्रणांना यश आले होते. पुन्हा धोका? आता त्याच भागात पुन्हा काही संशयित व्यक्ती तपास यंत्रणांच्या नजरेत आल्या आहेत, ज्यामुळे हे मोठे संयुक्त सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. सध्याच्या कारवाईबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी अत्यंत गोपनीयता पाळली आहे. पोलिसांनी केवळ इतकीच पुष्टी केली आहे की, हे एक संयुक्त सर्च ऑपरेशन आहे, ज्यात महाराष्ट्र पोलीस, पुणे पोलीस आणि केंद्रातील सुरक्षा यंत्रणा एकत्रितपणे काम करत आहेत. ही शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर या कारवाईचा तपशील अधिकृतरीत्या जाहीर केला जाईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. सध्या कोंढवा परिसरात पोलीस आणि सुरक्षा दलाचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.

Comments
Add Comment

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा