मुंबईची ही पहिली आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्गिका असून ती दररोज १३ लाख प्रवाशांना सेवा देणार आहे. कफ परेड ते आरे जेव्हीएलआर पर्यंतची ही ३३.५ किमी लांबीची मार्गिका फोर्ट, काळा घोडा, मरीन ड्राईव्ह, मंत्रालय, मुंबई उच्च न्यायालय, रिझर्व्ह बँक आणि नरिमन पॉइंटसारख्या महत्त्वाच्या केंद्रांना जलद जोडणी देईल.
मेट्रोच्या फेऱ्या आणि मार्गाची माहिती
दररोज २८० फेऱ्या होणार आहेत, ज्यामुळे प्रवासाच्या वेळेत अत्यंत कमी वेळ लागेल. मेट्रोच्या मार्गावर २७ स्थानके असतील, आणि एकूण ३३.५ किमी लांबीच्या मार्गावर मेट्रो सेवा चालवली जाईल. आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा १२.६९ किमी लांबीचा असून तो ७ ऑक्टोबर २०२४ पासून प्रवाशांसाठी खुला आहे.
दुसरा आणि तिसरा टप्पा
दुसरा टप्पा, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, ९.५ किमी लांबीचा असून ९ मे २०२५ रोजी लोकार्पित झाला आहे. या दोन्ही टप्प्यांमुळे मुंबईतील १६ स्थानकांवर मेट्रो सेवा सुरू झाली आहे, आणि दररोज ७०,००० हून अधिक मुंबईकर याचा फायदा घेत आहेत.
शेवटचा टप्पा
आता, शेवटचा टप्पा, आचार्य अत्रे चौक ते कफ परेड, ११ किमी लांबीच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरु होणार आहे. या मार्गावर २८ मेट्रो सज्ज आहेत. सकाळी पहिली मेट्रो ५:५५ वाजता सुरू होईल, आणि रात्री शेवटची मेट्रो १०:३० वाजता सुटेल.
महत्वाची स्थानके
शेवटच्या टप्प्यातील ११ स्थानकांमध्ये कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसमटी, काळबादेवी, गोरेगाव इत्यादी प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. या मार्गामुळे मुंबईतील प्रमुख केंद्रे, जसे की नरिमन पॉइंट, कफ परेड, फोर्ट, लोअर परेल, बीकेसी, सीप्झ आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ आणि २ यांना थेट जोडले जाईल.
मेट्रो ३ मार्गाचे इतर कनेक्शन्स
मेट्रो ३ अन्य मेट्रो मार्गांशीही जोडली गेली आहे, जसे स्वामी समर्थ नगर ते कांजूरमार्ग (मेट्रो ६), घाटकोपर ते वर्सोवा (मेट्रो १), दहीसर ते विमानतळ (मेट्रो ७ आणि ७अ), मंडाळे ते डी.एन. नगर (मेट्रो २) आणि चेंबूर ते सात रस्ता मोनोरेल.
तिकीट दर आणि प्रवासाची सोय
१३ लाख मुंबईकरांना याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. मेट्रोच्या तिकीटाचे दर १० रुपये ते ७० रुपये असतील, ज्यामुळे ही सेवा अधिक किफायतशीर आणि सोयीस्कर ठरेल.