अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना क्लीनचीट

मुंबई : बदलापूर (जि. ठाणे) येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर केलं होतं. यानंतर त्यावर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. दरम्यान आता न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना क्लीनचीट देण्यात आली आहे. स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा न्या. दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाने मान्य केला आहे.


शाळेतल्या चिमुकल्यांवर अत्याचार केल्याचा आरोप अक्षय शिंदेवर आरोप होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने लोकांनी एकत्र येत, रेल रोको केला होता. नागरिकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आरोपीला व्हॅनमधून नेण्याच्या प्रक्रियेवर आयोगाकडून काही सवाल देखील यावेळी उपस्थित केले आहे. त्यात आता न्या. दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगानेही पोलिसांना क्लीनचीट दिल्याने पोलिसांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. दरम्यान अक्षय शिंदेंच्या कुटुंबीयांची तक्रार नसल्याने मानवाधिकार आयोगाची या आधीच पोलिसांना क्लीन चीट मिळाली होती. अशातच आता आरोपीचं एनकाऊंटर करणाऱ्या पोलिसांना न्या.दिलीप भोसले आयोगाकडून निर्दोषत्व बहाल करण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

अक्षय शिंदे (24 वर्षे) हा बदलापूर येथील एका शाळेत सफाई कामगार/अटेंडंट म्हणून काम करत होता. ऑगस्ट 2024मध्ये त्याने शाळेच्या शौचालयात दोन लहान मुलींवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला. याबाबत POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि शिंदेला अटक करण्यात आली. मात्र 23 सप्टेंबर 2024 रोजी तळोजा तुरुंगात जात असताना पोलिस चकमकीत अक्षय शिंदेंचा मृत्यू झाला होता. हा एन्काउंटर फेक असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळं या प्रकरणाचा तपास एसआयटी स्थापन करुन करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सरकारी वकिल हितेन वेणेगावकर यांनी 3 मे पर्यंतची मुदत मागितली होती. तरीही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या 7 एप्रिलच्या आदेशाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

पोलिसांचा दावा काय?

तळोजा तुरुंगात जात असताना अक्षय शिंदेने एका काँस्टेबलचे पिस्टल हिसकावले आणि गोळीबार केला, म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वसंरक्षणात अक्षयवर गोळी झाडल्या. त्यावेळी संजय शिंदे यांच्यासोबत निलेश मोरे (सहायक पोलीस निरिक्षक), अभिजीत मोरे आणि हरीश तावडे (हेड काँस्टेबल) आणि एक चालकाचा होते.
Comments
Add Comment

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात

घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार, 'या' केंद्राची केली स्थापना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी