बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू





बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी एक भीषण अपघात झाला. मुसळधार पावसामुळे भूस्खलन  झाले आणि डोंगरावरून कोसळलेल्या प्रचंड मोठ्या दरडीखाली एक खासगी बस दबल्याने १५प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, बिलासपूरमधील बल्लू पुलाजवळ (Bhallu Bridge) ही दुर्दैवी घटना घडली. एका खासगी बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते. ही बस मरोतनहून घुमारवीकडे  जात होती. सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस पडत असतानाच अचानक पहाडीचा मोठा भाग कोसळला. मोठे दगड आणि मातीचा ढिगारा थेट बसवर कोसळल्याने बस पूर्णपणे ढिगाऱ्याखाली दबून गेली.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन दलाच्या मदतीने बचाव कार्य (Rescue Operation) सुरू करण्यात आले.


या अपघातात १५जणांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी अवस्थेत ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे.



बसमध्ये अजूनही काही लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगारा मोठा असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत, पण अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.


या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढत असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.








Comments
Add Comment

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'बंपर' भेट!; ८वा वेतन आयोग अखेर मंजूर; 'या' तारखेपासून होणार लागू, किमान वेतनात होणार 'इतकी' वाढ!

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अखेर आज ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात; एअर इंडियाच्या बसला आग

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात झाला. टर्मिनल ३ वर एअर इंडियाच्या बसला आग लागली. सुदैवाने

Jaipur Bus Accident : काळ आला पण वेळ...हाय टेंशन तारेच्या स्पर्शाने बसला भीषण आग, १२ कामगार होरपळले; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील जयपूर (Jaipur)  जिल्ह्यात कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागून भीषण दुर्घटना

भारताने युद्धासारख्या परिस्थितीसाठी सज्ज राहावे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर भारताने युद्धासारख्या

भारतातील तरुणांच्या लोकसंख्येत झपाट्याने घट

नवी दिल्ली : देशाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा अहवाल

Uttar Pradesh Crime : अक्षरशः क्रूरतेचा कळस, १२ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापून गळा चिरला अन् नंतर...थरकाप उडवणारी हत्या

झांसी : उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि क्रूर हत्येची घटना समोर आली आहे. बबीना पोलीस