गौतमी पाटील यांना पुणे पोलिसांकडून क्लीनचिट

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील नवले उड्डाणपुलाच्या परिसरात झालेल्या अपघात प्रकरणामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिला क्लीनचिट मिळाली आहे. पोलीस तपासात अपघाताच्यावेळी गौतमी पाटील ही गाडीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातावेळी गौतमी वाहनात नव्हती, अशी माहिती पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आल्याने पुणे पोलिसांकडून गौतमीला क्लीनचिट देण्यात आली आहे.


अपघाताच्यावेळी गौतमी गाडीत होती की नाही, हे तपासण्यासाठी पुणे पोलिसांनी १०० सीसीटीव्हींचे फुटेज पडताळले. त्यामध्ये अपघातावेळी गौतमीचा चालक हाच कारमध्ये उपस्थित असल्याचे स्पष्ट झाले आहे.


गौतमीच्या मालकीच्या कारने ३० सप्टेंबरला पहाटे एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालक सामाजी मरगळे गंभीर जखमी झाला होता. या रिक्षाचालकाच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या देत गौतमी हिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. गौतमी पाटील ही सेलिब्रिटी असल्याने तिच्याविरुद्ध कारवाई करताना चालढकल केली जात आहे, असा आरोपही झाला होता.

Comments
Add Comment

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा हिकारू नाकामुरावर पलटवार

मुंबई  : ‘चॅम्पियन्स शोडाउन’ या प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय विश्वविजेता डी.

२८ गावांतील आकारी पड जमीन शेतकऱ्यांना परत!

आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माणगाव खोरे विभागातील २८ गावांमधील हजारो

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी ६८ कोटींचा खर्च

विरार : वसई - विरार पालिका क्षेत्रातील सर्वच रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यांच्या

दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवर वाढीव भार अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने

कबुतरखान्यांसाठी महापालिकेकडून पर्यायी जागांचा शोध

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन मुंबई

बेस्टच्या १५७ नव्या वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण

बेस्टला सक्षम करण्याचे राज्य सरकारचे ध्येय मुंबई : 'जोपर्यंत बेस्ट उपक्रम ४० टक्क्यांपर्यंत बस