ऐरोली ते काटई नाका प्रकल्पाच्या कामाला आणखी सहा महिने लागणार

मुंबई (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई भागातील प्रवास जलद होण्यासाठी आणखी सहा महिने जाणार आहेत. हे अंतर वाहतूक कोंडीशिवाय सुसाट पार करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ऐरोली काटई नाका प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी मार्च २०२६ उजाडणार आहे. तोपर्यंत वाहन चालकांना कोंडीतून प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही. आता एप्रिल २०२६ मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे.


ऐरोली काटई नाका या प्रकल्पाचे काम एमएमआरडीएने तीन टप्प्यात हाती घेतले आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १२.३ किमी इतकी आहे. या मार्गामुळे कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईमधील अंतर ७ किमीने कमी होईल. त्यातून या भागातील प्रवासाच्या वेळेत १५ मिनिटांनी बचत होणार आहे. या पहिल्या दोन टप्प्याचे काम यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणार होते. मात्र याला आता मोठा विलंब झाला आहे. सध्या ठाणे- बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ या मार्गाचे सुमारे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये दोन स्वतंत्र बोगद्यांचा समावेश आहे. हे दोन्ही बोगदे खणून पूर्ण झाले आहेत.


पहिल्या टप्प्यात ३.४३ किमी लांबीचा मार्ग ठाणे बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ या दरम्यान उभारला जात आहे. यात १.६९ किमी लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात २.५७ किमी लांबीचा मार्ग ऐरोली पूल ते ठाणे बेलापूर रस्ता असा उभारला जात आहे. तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ येथून दिवा - पनवेल रेल्वे ओलांडून कल्याण शिळ रस्त्यावरील कटाई नाका कटाई नाका जंक्शनला जोडला जाणार आहे. हा मार्ग ६.७१ किमी लांबीचा असेल.

Comments
Add Comment

गुरुवारी राज्यातील ओला, उबर सेवा बंद

कॅब-रिक्षाचालक जाणार संपावर मुंबई (प्रतिनिधी) : परिवहन विभागाच्या गलथान कारभाराकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी

तळोजा एमआयडीसीचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद

डोंबिवली : अंबरनाथ तालुक्यातील जांभुळ जलशुद्धीकरण केंद्र आणि बारवी गुरूत्व वाहिनी देखभाल दुरुस्तीची कामे

मुंबई ते नवी मुंबई विमानतळांदरम्यानचा प्रवास होणार जलद

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सर्वात मोठी २ विनातळे एकमेकांना जोडली जाणार आहेत. मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत

मेट्रो ९ मार्गिका १५ डिसेंबर पर्यंत, मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा - सरनाईक

मुंबई : ठाणे आणि मीरा-भाईंदर क्षेत्रातील रहिवाशांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मेट्रो ९ मार्गिका १५

ठाणे, कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणार - शिंदे

मुंबई : मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन मार्गावर ठाणे जिल्ह्यातले म्हातार्डी रेल्वे स्थानक ठाणे, कोपर रेल्वे

नवख्या सहायक आयुक्तांना प्रशासनाने दिले थेट तोफेच्या तोंडी

संवेदनशील आणि अतिसंवेदनशील विभागात नवख्या सहायक आयुक्तांची नियुक्ती मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई