‘प्रेमाची गोष्ट २'चा अनोखा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई  : 'प्रेमाची गोष्ट २' या चर्चेत असलेल्या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. एका लव्हस्टोरीच्या अरेंज मॅरेजभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.


सतीश राजवाडे दिग्दर्शित 'प्रेमाची गोष्ट २' च्या ट्रेलरमध्ये एक खास गोष्ट दिसतेय. ललित प्रभाकरचं ऋचा वैद्यसोबत लग्न ठरतं. ऋचाचे वडील त्याला नोकरीलाही लावतात. आधी मैत्रीण असलेली मुलगी नंतर बायको होते. दोघे लग्नानंतर आनंदी असतात. परंतु हळूहळू त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. अशातच ललितच्या आयुष्यात त्याच्या बालपणीची क्रश समोर येते. त्यामुळे ललित बायकोला सोडून तिच्यासोबत वेळ घालवतो. ललितची बायको त्या दोघांना रंगेहाथ पकडते, त्यामुळे त्यांचं जोरदार भांडण होतं.



पुढे ललितला भेटायला थेट स्वर्गातून दोन माणसं येतात. ती माणसं म्हणजे स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम. स्वप्नील-भाऊकडून ललितला नशीब बदलण्याची एक संधी दिली जाते, मग पुढे काय होतं? हे सिनेमा आल्यावरच पाहायला मिळेल. 'प्रेमाची गोष्ट २' या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून, निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली आहेत. २१ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Comments
Add Comment

निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

जागतिक मराठी संमेलन गोव्यात ; ९ जानेवारीला देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन ; महेश मांजरेकर यांना जीवनगौरव

जुन्या चित्रपटांचे वैभव प्रेक्षक पुन्हा अनुभवणार

वंचितांचं जगणं आणि त्यात आत्मजाणिवेनं होणारं परिवर्तन यांची हृदयस्पर्शी आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी

‘बोल बोल राणी, इता इता आणी’ या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग

बालदिनाच्या पूर्वसंध्येला ऑल प्ले प्रोडक्शन्सतर्फे त्यांच्या पहिल्या शॉर्ट फिल्मची “बोल बोल राणी, इता इता

पनवेलकरांसाठी २३ नोव्हेंबरला पीव्हीआरमध्ये ‘असंभव'चे प्रदर्शन

मराठीतील चार नावाजलेले, गुणी आणि दमदार कलाकार म्हणजे मुक्ता बर्वे, सचित पाटील, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे

देवीच्या जत्रेत छाया कदमची कोकणात हजेरी

अभिनेत्री छाया कदम यांनी कोकणातील धामापूर गावातील सातेरी देवीच्या जत्रेला हजेरी लावत एक खास व्हिडीओ सोशल

‘अबब! विठोबा बोलू लागला’ बालनाट्य नव्या संचात

गेल्या वर्षभरात विविध विषयांवर अनेक मराठी नाटकं रंगभूमीवर आली. नवीन नाटकांसोबतच जुनी गाजलेली काही नाटकं