मेट्रो-५ साठी एमएमआरडीए २२ गाड्या खरेदी करणार

२ हजार ६४० कोटी रुपये खर्च


मुंबई (प्रतिनिधी): 'ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो ५' मार्गिकेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २२ गाड्या खरेदी करण्यासाठी फेब्रुवारी २०२४ मध्ये निविदा मागविल्या होत्या. अखेर दीड वर्षांनंतर एमएमआरडीएने गाड्यांच्या खरेदीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. टिटागढ रेल सिस्टीमला हे कंत्राट देण्यात आले असून २ हजार ६४० कोटी रुपये खर्च करून मेट्रो ५ साठी २२ गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत.


एमएमआरडीएमार्फत मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणण्यात येत आहे. यापैकी २४.४५ किमी लांबीच्या मेट्रो ५ मार्गिकेचे काम एमएमआरडीए दोन टप्प्यात करीत आहे. अंदाजे ८५०० कोटी रुपये खर्चाच्या आणि १७ स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करून ही मार्गिका सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. दरम्यान, या मार्गिकेच्या कापूरबावडी- धामणकर नाका दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू असून या टप्प्याचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.


तर धामणकर नाका- कल्याण या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. या मार्गिकेसाठी २२ गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाड्यांच्या खरेदीसाठी एमएमआरडीएने फेब्रुवारी २०२४ मध्ये निविदा काढल्या होत्या. मात्र आतापर्यंत निविदा अंतिम झाली नव्हती. अखेर दीड वर्षानंतर निविदा अंतिम झाली आहे. टीटागढ रेल सिस्टीम या कंपनीला ही निविदा देण्यात आली आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला नुकतीच एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Comments
Add Comment

अंधेरी रेल्वे स्टेशनवरील धर्मांतराचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल ; पोलीस तपासात आली भलतीच माहिती समोर

मुंबई : सोशल मीडियावर अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतर सुरु असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजपा, शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग

मुंबई (सचिन धानजी): उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपाचा

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व

मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष लोकल

मुंबई  : पश्चिम नौदल कमांड (डब्ल्यूएनसी) नेव्ही हाफ मॅरेथॉननिमित्त मध्य रेल्वेने शनिवारी रात्री विशेष लोकल

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावले समन्स! 'त्या' पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकारांची हजेरी

मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे समन्स