'अनिल परबांनी आठ हजार रहिवाशांना धमकावून घरे रिकामी केली'


मुंबई : विलेपार्ले येथील एका एसआरए योजनेतील आठ हजार रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी अनिल परब यांनी धमकावले, असा गंभीर आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव समर्थक आमदार अनिल परब यांच्यावर केला आहे. उद्धव समर्थक अनिल परबांमुळेच मुंबईतले आठ हजार मराठी रहिवासी देशोधडीला लागले आहेत, असाही आरोप रामदास कदम यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांनी हे आरोप केले.


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता. त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले,’ असा सनसनाटी आरोप कदम यांनी दसरा मेळाव्यात केला होता. आता रामदास कदम यांनी अनिल परबांवर नव्या आरोपाची तोफ डागली आहे.


‘विलेपार्ले येथील एसआरएच्या योजनेसंदर्भातील प्रतिज्ञापत्र माझ्याकडे आहे. ही योजना अजून पूर्ण झालेली नसून, परब यांनी आठ हजार मराठी माणसांना घरे रिक्त करण्यासाठी धमकी दिली. या योजनेतील रहिवाशांना फ्लॅट देईन, असे अनिल परब यांनी सांगितले होते. ‘या आठ हजार रहिवाशांना फक्त एक वर्षाचे भाडे दिले. ही मराठी माणसे नऊ वर्षांपासून मुंबईबाहेर आहेत. हे पैशासाठी बिल्डरांचे पाय चाटतात. उबाठाचे पदाधिकारी संजय कदम आणि अनिल परब यांनी कोट्यवधी रुपये कमावले. बिल्डरने यांना मर्सिडीज दिल्या. संजय कदमने बाइक वाटल्या. याबाबत तिथल्या रहिवाशांनी याबाबत प्रतिज्ञापत्रे दिली आहेत,’ असे रामदास कदम म्हणाले.


Comments
Add Comment

इंदू मिलच्या जागेत महामानवाचे स्मारक प्रगतिपथावर

प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्राची संरचनात्मक कामे पूर्ण मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.