पुण्यातील जि.प. शाळेला ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट शाळेचा पुरस्कार

ब्रिटनस्थित ‘टी४ एज्युकेशन’ संस्थेने जालिंदरनगर (ता.खेड, जि. पुणे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ‘२०२५ वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइज कम्युनिटी चॉइस ॲवार्ड’साठी निवड केली आहे. अबुधाबी येथे वितरण टी फोर एज्युकेशन संस्थेतर्फे १५ आणि १६ नोव्हेंबरला अबुधाबी येथे वर्ल्ड स्कूल समिट होणार असून, त्यामध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. एक कोटी रुपयांचे बक्षीस आहे. कोविडकाळात ज्या शाळांनी सर्वोत्कृष्ट काम करून विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला अशा शाळांना हा पुरस्कार दिला जातो. खेड तालुक्यातील या शाळेत विद्यार्थ्यांना विषयानुकूल अभ्यासक्रम शिकवला जातो. विद्यार्थी एकमेकांनाही शिकवतात.


या शाळेतील एका शिक्षकाने सांगितले की, ''या पुरस्कारामुळे आमच्या शाळेच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. दुर्गम असलेल्या जालिंदरनगरच्या या शाळेत २०२२ साली केवळ तीन विद्यार्थी होते. कमी पटसंख्या असल्याने शाळा बंद होण्याच्या मार्गावर होती. पण दोन वर्षांत या शाळेने परिवर्तन घडून आणले. दत्तात्रय वारे यांनी हे परिवर्तन केवळ पायाभूत पातळीवर झाले नाही, तर शैक्षणिक स्तरावरही हा बदल घडून आला आहे''.


या जिल्हा परिषद शाळेची निवड ही ५० शाळांच्या यादीमधून करण्यात आली आहे. या शाळेला पुरस्कार देण्यासाठी सर्वाधिक मतदान मिळाले. ‘टी४ एज्युकेशन’ संस्था जगभरातील सुमारे १०० देशांमधील दोन लाख शिक्षकांचे प्रतिनिधित्व करीत आहे.

Comments
Add Comment

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी