दुर्गंधी पसरत नाही की कचरा दिसत नाही, मुंबईतल्या अनोख्या कचरापेट्या


सचिन धानजी, मुंबई : मुंबईत आज कुणालाच आपल्या घरासमोर कचरा नको असतो. तसेच सार्वजनिक कचरा पेट्या असल्यास त्या हटवण्याची मागणी केली जाते. तसेच रुग्णालय परिसरातील कचरा इतरत्र पडून त्यापासून पसरणारी दुर्गंधी आणि उघड्यावरील अस्वच्छता यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने भूमिगत कचरा पेट्या बसवण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत मुंबई महापालिकेने केईएम, शीव, कस्तुरबासह इतर ठिकाणी भूमिगत कचरा पेट्या बसवून उघड्यावरील कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केला. त्यानुसार आतापर्यंत मुंबईत तब्बल ३८ भूमिगत कचरा पेट्या सध्या वापरात असल्याने जनतेला एक मोठ्याप्रमाणात दिलासा मिळालेला आहे.


मुंबईत अनेक सार्वजनिक ठिकाणी कचर्‍याचे डबे ठेवण्यात आले आहे. या उघड्यावर ठेवण्यात येणार्‍या कचर्‍यामुळे उग्रवास आसपासच्या परिसरात पसरतो. तसेच कचरा उघड्यावर असल्याने बर्‍याच ठिकाणी मोकाट जनावरे तसेच कचरा वेचकांकडून पेट्यांतून कचरा फेकला जातो. त्यामुळे कचरा पेट्यांचा परिसर अस्वच्छ होतो, शिवाय या कचर्‍यामुळे पादचार्‍यांनाही चालता अडचणी येत असतात. या तुलनेत भूमिगत कचर्‍याचे डबे जमिनीखाली बसवल्यास यामुळे कचर्‍यापासून होणारी दुर्गंधी कमी होईल. तसेच पादचार्‍यांना कचरा पेट्यांजवळून जातानाही कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. त्यामुळे मोकाट जनावरे तसेच कचरा वेचकांकडून जो कचरा अस्तवस्त पडला जातो, त्यावर नियंत्रण येवून आरोग्य चांगले जाईल, या हेतूने महापालिकेने प्रायोगिक तत्वावर ए, डी, पी/उत्तर व आर/मध्य या विभागातील या प्रत्येकी एका ठिकाणी अशा ठिकाणी एकूण चार ठिकाणी आधुनिक भूमिगत स्वरुपाचे २.२ घनमीटर क्षमतेचे डबे बसवले होते.


चार ठिकाणी बसवण्यात आलेल्या या भूमिगत कचरा पेट्यांच्या यशस्वी प्रयोगानंतर आता महापालिकेच्या उर्वरीत २० विभागांमध्ये ४० ठिकाणीआधुनिक स्वरुपाचे २.२ घनमीटर क्षमतेचे कचरा डबे बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आतापर्यंत केईएम रुग्णालयात सर्वांधिक म्हणजे ०६ भूमिगत कचरा पेट्या, शीव रुग्णालयात ०४, नायर रुग्णालयात ०२, कस्तुरबा रुग्णालयात ०२ आणि जीटीबी रुग्णालयात ०३ अशाप्रकारच्या रुग्णालय परिसरातच १७ भूमिगत कचरा पेट्या बसवल्या आहेत. महापालिकेच्या पाच रुग्णालयांमधील १७ भूमिगत कचरा पेट्यांसह एकूण ३८ भूमिगत कचरा पेट्या गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, आक्सा चौपाटी, कुलाबा मच्छिमार नगर, शीव शक्तीनगर,गोराई जेटी, भायखळा राणीबाग, अफगाण चर्च, ओल्ड कस्टम हाऊस, संधू गार्डन, केडी गार्डन आदी ठिकाणी बसवण्यात आल्या असून याला चांगल्याप्रकारचा प्रतिसाद लाभत आहे. विशेष म्हणजे या पेट्यांची देखभालही योग्यप्रकारे राखली जात आहे.


उघड्यावरील कचऱ्यावर नागरिकांना होणारा त्रास तसेच त्यापासून पसरणारी दुर्गंधी यामुळे मुंबई महापालिकेने राबवलेल्या या निर्णयानंतर भूमिगत कचरा पेट्यांची संख्या वाढत जात आहे. एरव्ही सार्वजनिक कचरा पेट्यांना विरोध करणाऱ्या जनतेकडून या भूमिगत कचरा पेट्यांची संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंबईला कचरा मुक्त करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे भविष्यात या भूमिगत कचरा पेट्यांची संख्या वाढवली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.


मुंबईत अशाप्रकारे बसवण्यात आल्या आहेत भूमिगत कचरा पेट्या


केईएम रुग्णालय : ०६


शीव रुग्णालय : ०४


कस्तुरबा रुग्णालय : ०२


जीटीबी रुग्णालय : ०३


घाटकोपर शीव मंदिर : ०२


घाटकोपर बानपाकोडे :०२


चर्नीरोड गिरगाव चौपाटी : ०१


फोर्ट ओल्ड कस्टम हाऊस : ०१


बोरीवली गोराई जेटी : ०१


मालाड आक्सा बिच : ०१


वीर माता जिजाबाई भोसले उद्यान : ०१


ए विभाग, अफगाण चर्च : ०१


मुंबई सेंटर नायर रुग्णालय : ०२


चेंबूर, संधू गार्डन, सातवा क्रॉस लेन : ०१


भांडुप अंकुर हॉस्पिटल, मेयर गार्डन समोर : ०३


कांदिवली के.डी. कंपाऊंड : ०२


जुहू बीच : ०२


कुलाबा मच्छिमार नगर : ०२


कुलाबा शिवशक्ती नगर : ०१


Comments
Add Comment

मुंबईतील कचरा खासगीकरणाच्या निविदेला विलंब

खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

मुंबईत साथीच्या आजारांचे वाढले प्रमाण

मुंबई : गेल्या पंधरावड्यात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात

'आपली एसटी' ॲपद्वारे कळणार लालपरीचा ठावठिकाणा - प्रताप सरनाईक

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई

तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर

बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस 'मातोश्री'त का ठेवला?

रामदास कदम यांचे दसरा मेळाव्यात खळबळजनक विधान; 'मृत्युपत्रात सही कोणाची होती?' चौकशीची मागणी मुंबई: शिवसेनेचे