UPI UPDATE : UPI वरून 'Collect Request' बंद ,जाणून घ्या नवीन नियम !

मुंबई : UPI वापरकर्त्यांसाठी एका महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm किंवा इतर कोणतेही UPI ॲप वापरत असाल, तर हे नवीन नियम लक्षात ठेवा. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI च्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आजपासून, P2P 'कलेक्ट रिक्वेस्ट' किंवा 'पुल ट्रान्झॅक्शन' नावाचे फीचर बंद केले आहेत. म्हणजे तुम्ही कोणालाही पैसे मागण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही.



नवीन कायदा काय सांगतो?


NPCI ने सर्व बँका आणि पेमेंट ॲप्सना आदेश दिला आहे की १ ऑक्टोबर २०२५ पासून P2P कलेक्ट रिक्वेस्ट फीचर बंद करावे. या तारखेपासून कोणतीही पेमेंट रिक्वेस्ट पाठवणे किंवा स्वीकारणे शक्य होणार नाही. हा बदल वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी आणि ऑनलाईन फसवणूक कमी करण्यासाठी करण्यात आला आहे.



हे नियम का लागू करत आहेत?


या फीचरचा फसवणुकीसाठी चुकीचा वापर अनेकदा केला जात होता. काही लोक फसवणूक करण्यासाठी लोकांना पैसे मागण्याच्या विनंती पाठवत होते, ज्यामुळे लोकांना नुकसान होत असे. या नियमांमुळे सायबर गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी मदत होणार आहे.


आता, तुम्हाला जर कोणाकडून पैसे घ्यायचे असतील, तर तुम्ही कलेक्ट रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही. पैसे मागण्यासाठी थेट पैसे पाठवण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल, म्हणजे तुम्हाला 'पुश ट्रान्झॅक्शन' करावे लागेल. तुम्ही QR कोड स्कॅन करून, UPI ID वापरून किंवा बँक अकाउंट नंबरद्वारे पैसे देणे सुरू ठेवू शकता. या सुविधा पूर्ववत राहतील.


सर्व बँका आणि पेमेंट ॲप्स या बदलांनुसार आपली सिस्टीम अपडेट करत आहेत. म्हणून तुमचे ॲप्स वेळोवेळी अपडेट करत राहा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या कलेक्ट रिक्वेस्टला मंजुरी देऊ नका. NPCI ने हा निर्णय युजर्सच्या सुरक्षिततेसाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी घेतलेला एक महत्त्वाचा उपाय आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा ९ दिवस मेगाब्लॉक! 'या' स्थानकांदरम्यान वाहतूक राहणार बंद, लांबपल्ल्याच्या लोकल ट्रेनला फटका

मुंबई: कर्जत स्थानकाच्या पुनर्रचना कामासाठी मध्य रेल्वेने ९ दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा मेगाब्लॉक २४

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या

अक्सा बीचवर १३ वर्षांचा मुलगा बुडाला

मुंबई: दिवाळीच्या दिवशीच मुंबईतील मालाड येथील अक्सा बीचवर एक हृदयद्रावक घटना घडली. मयंक ढोलिया (१३) नावाचा मुलगा

रस्त्यांवर खोदलेले चर बुजवण्यासाठी नव्याने सात कंपन्यांची निवड, दोन वर्षांसाठी तब्बल २५७कोटी रुपये करणार खर्च!

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील रस्त्यांखालून तसेच पदपथांखालून विविध सेवा सुविधांचे जाळे पसरले गेलेले असून अनेकदा

महापालिकेच्या केईएम,शीव, नायर रुग्णालयांची भिस्त खासगी सुरक्षेवर, महिन्याला एवढा होतो खर्च...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका सुरक्षा रक्षक खात्यातील रिक्तपदे वाढतच चाललेली असून आजही महापालिकेच्या