Gold Rate: US Shutdown धोरणाचा सोन्यात मोठा फटका सोने आणखी एक उच्चांकी पातळीवर जाणून घ्या सोन्यातील जागतिक हालचाल

मोहित सोमण:आज दिवसभरात कमालीची जागतिक अस्थिरता कायम राहिल्याने आज सोन्यातील कमोडिटीत मोठा फटका बसला आहे. आज बुधवारी सोने नव्या उच्चांकावर पोहोचले. युएस देशांतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कपात सुरू झाली.तसेच सरका री कामकाज ठप्प झाले असून सरकारी शटडाऊन (US Government Shutdown) थोड्या वेळापूर्वी लागू झाल्यानंतर आता सोन्यात संध्याकाळपर्यंत आणखी दबाव वाढल्याने सोने आणखी महागले आहे.डॉलरच्या निर्देशांकात घसरणीमुळे आणखी हातभार सोन्याच्या दरवाढीला झाल्याने सोने उसळले आहे.'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १२० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ९० रूपयांनी वाढ झाली आ हे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी ११८६४ रूपये, २२ कॅरेटसाठी १०८७५ रूपये, १८ कॅरेटसाठी ८८९८ रूपयांवर पोहोचले आहे.


संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १२०० रुपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ११०० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ९०० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १ १८६४० रूपये, २२ कॅरेटसाठी १०८७५० रूपये, १८ कॅरेटसाठी ८८९८० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मधील सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.७४% वाढ झाली आ हे. तर सोन्याची एमसीएक्स दरपातळी ११८१३६ रुपयांवर गेली. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी ११८६४ रूपये, २२ कॅरेटसाठी १०८७५ रूपये, १८ कॅरेटसाठी ८८९८ रूपयांवर गेले आहे.


जागतिक बाजारपेठेतील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.९०% वाढ झाली आहे. तर जागतिक मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.९१% वाढ झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ३८८१.२६ औंसवर गेली आहे.तर आज सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत कारण गुंतवणूकदारांनी शटडाऊनच्या संकटादरम्यान सुरक्षित गुंतवणूकीला (सोन्याच्या) प्राधान्य दिले असल्याने एकूण सकाळ सत्राच्या सुरुवातीलाच गोल्ड फ्युचरने $३८७५.३२ या आजीवन उच्चांकी पातळीला (All time High )स्पर्श केल्यानंतर, स्पॉट गोल्ड ०.१% टक्क्यांनी वाढून $३८६१.९९ प्रति औंसवर पोहोचले होते.कमकुवत डॉलर, अमेरिकेतील सरकारी शटडाऊनमुळे सुरू असलेली राजकीय परिस्थिती आणि सामान्य भू-राजकीय अनिश्चिततेमुळे सोन्याला फायदा होत आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.


तज्ञांच्या मते, डॉलर निर्देशांक एका आठवड्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्याने परदेशी खरेदीदारांसाठी सोने स्वस्त झाले आहे, ज्यामुळे मागणी आणखी वाढली आहे. बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे की शटडाऊनमुळे डॉलरचे चलन कमकुवत होऊ शकते आ णि अमेरिकन ट्रेझरी उत्पन्नावर यापुढे आणखी ताण येऊ शकतो. वॉशिंग्टनमध्ये शटडाऊनचे नाट्य सुरू होत असताना, जगभरातील बाजारपेठा अमेरिकन कायदेकर्त्यांना (Lawmakers) साठी ही गतिरोधकता दूर करता येते का यावर बारकाईने लक्ष ठेवतील. तोपर्यंत, मालमत्ता वर्गांमध्ये अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. भारतीय गुंतवणूकदारांसाठी, विविधीकरण ही सर्वोत्तम रणनीती आहे सोने, इक्विटी आणि स्थिर उत्पन्नातील जोखीम संतुलित करणे आणि अल्पकालीन बाजारातील चढउतारांना अतिरेकी प्रतिक्रिया देणे टाळणे' असेही भारतीय तज्ञांनी यावेळी स्पष्ट केले आहे.भारतीय बाजारपेठेत सकाळपर्यंत निचांकी पातळीवर रूपया घसरला होता. मात्र आरबीआयच्या रेपो दर निर्णयानंतर रूपया १२ पैशाने रिकव्हर झाला होता. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला त री रूपयांच्या एकूणच घसरणीमुळे भारतीय सराफा बाजारात सोने महागले आहे.


बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'अमेरिकन सरकारच्या शटडाऊनच्या चिंतांमुळे सुरक्षित-निवास मागणीला पाठिंबा मिळाल्यानंतर COMEX सो न्याचा भावही ९०० रुपयांनी वाढून ११८,१९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. सत्र अस्थिर राहिले, जवळजवळ $८० च्या नफा बुकिंगमुळे किंमती $३८७० वरून $३७९० पर्यंत खाली आल्या आणि त्यानंतर पुन्हा खरेदी केल्याने सोन्याने $३८९५ पातळीच्या वर नवीन उ च्चांक गाठला. MCX वर, किमतींनी ११५५०० रूपये पातळीच्या जवळ आधार चाचणी केली आणि नंतर ११७७०० रूपये पातळीच्या पूर्वीच्या उच्चांकाला मागे टाकून सध्याच्या शिखरावर पोहोचल्या. पुढे डेटा-हेवी आठवडा असल्याने, प्रमुख अमेरिकन आर्थिक प्र काशनांसह, सोने ११४०००-११९००० रूपये पातळीच्या विस्तृत श्रेणीत अत्यंत अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे.'

Comments
Add Comment

दिल्लीत जैश-ए-मोहम्मदकडून हवालामार्गे आले २० लाख ? तपासकर्त्यांसमोर नवीन कोडे

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासात गुप्तचर यंत्रणांना डॉ. उमर, डॉ.

लाल किल्ला स्फोट प्रकरणात नवे धागेदोरे; आरोपी डॉ. उमर उन-नबी नुहमध्ये गुप्तपणे वास्तव्यास असल्याचा तपास यंत्रणांचा दावा

नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ ह्युंडाई i20 कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर सुरू असलेल्या चौकशीत

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

छत्तीसगडमधील सुकमात चकमक, तीन नक्षलवादी ठार

सुकमा : छत्तीसगडमधील सुकमाच्या जंगलात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत तीन माओवादी

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे.