सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे, यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या विनंती वजा आग्रहामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २३ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.


मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली आणि सावंतवाडी कार्यकारी अभियंत्यांना खड्डे बुजवण्यासाठी व रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी परिपूर्ण अहवाल देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या अहवालानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडून २३ कोटी ७८ लाख रुपये इतका निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी मंजूर करून घेतला आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी १५ मेपासून पाऊस सुरू झाला. साडेचार महिने सातत्याने पाऊस पडत आहे. अजूनही एक महिना पाऊस पडण्याची
शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यांची नादुरुस्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. अनेक रस्त्यांवर खड्डे निर्माण झाल्यामुळे हे खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी यापूर्वीच्या बैठकीत सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीचे अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकामाच्या ८८ रस्त्यांसाठी हा निधी प्राप्त झालेला आहे.


पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भरघोस असा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलेला असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा खड्डेमुक्त होईल, असा विश्वास निर्माण झाला आहे.

Comments
Add Comment

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी

IRCTC Website Crash : ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि ॲप अचानक ठप्प

दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची मोठी गैरसोय दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना आज एक मोठी तांत्रिक

सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे

सिंधुदुर्गात वाड्या, रस्त्यांच्या जातीवाचक नावांऐवजी आता महापुरुषांची नावे

नावे बदलणारा राज्यातील पहिला जिल्हा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला प्रक्रियेत सावळागोंधळ

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी,